दिगंबर जैन महासमितीतर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

    दिनांक :09-Jun-2026
Total Views |
यवतमाळ,
world-environment-day : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त श्री दिगंबर जैन महासमिती यवतमाळ जिल्हातर्फे ऑक्सिजन पार्क, प्रयासवन गोधनी रोड येथील परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करून त्यांच्या संगोपन व संवर्धनाचा संकल्प करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अशोक रोहणे, सचिव डॉ. शेखर बंड, कार्यकारी अध्यक्ष नंदकुमार महाजन, विधी सल्लागार अ‍ॅड. रवीशेखर बदनोरे उपस्थित होते. याप्रसंगी कोषाध्यक्ष नेमीनाथ राऊळकर, सहसचिव राजेश इंदाने, जिल्हा कार्यकारणी सदस्य उमेश पकाले, अजय गुलालकरी, अधीर काळे उपस्थित होते. वन कर्मचारी योगेश वंजारी, अमोल वंजारी, लक्ष्मण मडावी यांनी वृक्षारोपणासाठी सहकार्य केले.
 
 

y9Jun-Band