गडचिरोली,
Dr. Bharat Pande तालुक्यातील आष्टी परिसर ‘गाव तिथे स्मशानभूमी’ या योजनेपासून वंचित असून आष्टी येथे आधुनिक पद्धतीने स्मशान भूमीची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी ओम विकास बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. भारत पांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेवून केली आहे.
गाव तिथे स्मशान भूमी ही महाराष्ट्र सरकारची योजना असून जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाण असणारे आष्टी हे गाव चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला जोडणार्या वैनगंगा नदीच्या किनार्यावर आहे. असे मध्यवर्ती असणारे गाव शासनाच्या गाव तिथे स्मशान भूमी या योजनेपासून वंचित आहे. आष्टीच्या वैनगंगा नदीच्या दोन्ही किनार्यावर चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी, मार्कंडा (कंसोब), तारसा, राडापेट, विठ्ठलवाडा, तळोधी, गोंडपिपरी या परिसरातील जनता अंत्यविधी करीता वैनगंगा नदीच्या दोन्ही किनार्यावर येतात. मात्र, स्मशान भूमीची व्यवस्था नसल्यामुळे नदीच्या खुल्या जागेवर पारंपारिक पद्धतीने अंत्यविधी पार पाडत असतात. मात्र कधीकधी निसर्गाने धोका दिल्यास भर पावसात किंवा उन्हामध्ये अंत्यविधी पार पाडावी लागते. आज सुरजागड आणि लॉयड मेटल कोनसरी व भविष्यात अनेक मोठे व्यवसाय या परिसरात येत आहेत. सध्यातरी दिवसरात्र रस्त्यावर रहदारी वाढल्यामुळे नदीकडे प्रेत नेतांना अनेक अडचणी येतात. कधी कधी अपघात होण्याची शक्यता देखील निर्माण होते. त्यामुळे या बाबीचा विचार करून शासनाने ‘गाव तिथे स्मशानभूमी’ या योजनेद्वारे नदीच्या दोन्ही किनार्यावर आधुनिक पद्धतीची स्मशान भूमीची निर्मिती करावी, अशी मागणी डॉ. पांडे यांनी केली आहे.
Dr. Bharat Pande ज्या स्मशानभूमीमध्ये लाईटची व्यवस्था, येणार्या पाहुण्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, नदीखाली उतरण्याकरिता पायर्या, अंत्यविधी करताना धार्मिक विधी पार पाडण्यासाठी बसण्याची व्यवस्था, सभोताल सावलीची व्यवस्था व भविष्यात लाकूड मिळणार नाही म्हणून आधुनिक पद्धतीची प्रेत जाडण्याची मशीन आदींची व्यवस्था नदीच्या दोन्ही किनार्यावर करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.