शेतकर्‍यांची कोरड्या मातीला घातली साद; धूळपेरणीला सुरवात

    दिनांक :09-Jun-2026
Total Views |
आजनसरा, 
Farmers पेरणी योग्य पावसाची वाट न पाहता परिसरातील शेतकर्‍यांनी आज कोरड्या मातीला साद घातली. पहाटेच्या प्रहरी सजवलेल्या बैलजोडीसह शेतकरी बांधावर उतरला आणि धूळपेरणीच्या कामाला सुरवात झाली. आकाशाकडे डोळे लावून बसण्यापेक्षा कष्टावर विश्वास ठेवणार्‍या शेतकर्‍यांनी कापूस आणि ज्वारीचे बी काळ्या आईच्या स्वाधीन केले. जमिनीला भेगा कायम असल्या तरी शेतकर्‍यांचा निसर्गावर विश्वास आहे.
 
 
perni
 
येथील जमीनदार शेतकरी कृष्णाजी पर्बत म्हणाले, आमची ही परंपराच आहे. पाऊस पडायच्या आधी पेरणी केली की बीज मातीत रुतून बसतं. पहिला पाऊस पडला की लगेच अंकुर फुटतो. हा निसर्गावरचा आणि कष्टावरचा आमचा विश्वास आहे. यंदा अनेक शेतकर्‍यांनी पारंपरिक नांगराला आधुनिक पेरणी यंत्र जोडले आहे. पण, बैलांच्या गळ्यातली घंटा आणि नांगराचा आवाज अधिक सुखावून जाते. परंपरा आणि आधुनिकतेची ही सांगड शेत शिवारात पाहायला मिळाली. हवामान खात्याने १५ जुनपर्यंत पावसाचा अंदाज दिला आहे.