मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचे 12 जूनला आरक्षण

    दिनांक :09-Jun-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
आर्णी, 
gram-panchayat-reservation : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आर्णी तालुक्यातील मुदत संपलेल्या आणि नवनिर्मित एकूण 70 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्यांची आरक्षण सोडत शुक्रवार, 12 जूनला तहसीलदार वैशाख वाहुरवार यांच्या उपस्थितीत आर्णी तहसील कार्यालयात दुपारी 11 आणि 2 वाजता सोडत पद्धतीने निश्चित करण्यात येणार आहे.
 
 
 
kolk
 
 
 
या प्रक्रियेत बिगर व अंशतः अनुसूचित क्षेत्रातील 2024, 2025 आणि 2026 मध्ये मुदत संपलेल्या म्हसोला का, देऊरवाडी बु, पिंपळनेर, शेंदुरसनी, शिरपूर, बोरगाव पु, इचोरा, तरोडा, यरमल, वरुड भक्त, केळझरा वरठी, तळणी, कुèहा, उमरी इ, विठोली, आयता, कवठा बु., वरुड तुका, दहेली, लोणबेहळ, उमरी पठार, केळझरा को, सुकळी, देवगाव, जांब, अंजी ना, घोन्सरा, मुकींदपूर, खंडाळा, सायखेडा, ब्राम्हणवाडा, बोरगाव दा, पांगरी, शेकलगाव, अंबोडा, साकूर, अंजनखेड, किन्ही, गणगाव, तेंडोळी, अंतरगाव, पळशी, लोणी, खेड, काठोडा, माळेगाव, बारभाई, शेलु ब्रा, पांढुर्णा, सातारा, कुरा, शेलू से, परसोडा, शारी, कवठाबाजार, आसरा, जवळा, चिखली ई, पहुर न, चिकणी क, महाळुंगी, राणीधानोरा, दाभडी, सुभाषनगर, कोसदणी, कोपरा आणि नव्याने स्थापित चिंचबर्डी, नाईकनगर, गवणा, साखरतांडा यांचा समावेश आहे.
 
 
संबंधित महसूल व ग्रामपंचायत अधिकाèयांनी 8 जून रोजी जाहीर सूचना प्रसिद्ध करून प्रतिष्ठितांच्या स्वाक्षरीसह अहवाल तहसील कार्यालयात सादर करावा. यापूर्वी सरपंच आरक्षण व वॉर्डरचना पूर्ण झाली असून, सदस्य आरक्षणानंतर प्रत्यक्ष निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे.