३३ वर्षांची अखंड परंपरा
तळेगाव (श्या. पंत),
'Gramgeeta Das Atre Maharaj' Jayanti राष्ट्रीय महामार्ग ६ वर असलेल्या निसर्गरम्य स्थळी बाहुबली हनुमान मंदिर परिसरात मानव विकास ज्ञानसाधनास आश्रम, तळेगाव येथे गुरुवर्य ग्रामगीता दास अत्रे महाराज यांच्या जयंती महोत्सवानिमित्त ३३ वे बाल सुसंस्कार शिबिर तब्बल १२ दिवस तडाख्याच्या उन्हात झाले. ४६.७ अंशाच्या उन्हाच्या तडाख्यात ४५ चिमुकले वारकरी तावून सुलाखून बाहेर निघाले. आद्य ग्रामगीताचार्य रामकृष्ण बेलूरकर व ग्रामगीता दास रामकृष्ण अत्रे महाराज यांच्या प्रेरणेने तसेच प्रफुल दादांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेली ही शिबिर परंपरा यंदा ३३ वर्षे पूर्ण करून सुवर्णपर्वात पदार्पण केले आहे.
महिन्याच्या तीव्र उन्हाची झळ सोसतही ४५ शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी संपूर्ण शिबिरात अखंड सहभाग नोंदवला. आश्रमात विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर जीवन जगण्याचे संस्कार देण्यात आले. शिबिर प्रमुख आचार्य प्रफुल यांचे शिष्य संदेश महाराज आमटे यांच्या नेतृत्वाखाली विनोद कडगे, देवानंद ढोक, देवागुरू, राजू गुरुजी आदींनी ध्यान, प्रार्थना, योगसाधना, प्राणायाम, शारीरिक व्यायाम, कराटे, लाठीकाठी, वक्तृत्व, संगीत, स्वयंसेवा, देशसेवा, ज्येष्ठांचा आदर-सत्कार आणि मोबाईल विरहित जीवन या विषयांचे प्रात्यक्षिकासह धडे देण्यात आले. सकाळी ५ वाजल्यापासून रात्री झोपेपर्यंतची संपूर्ण दिनचर्या शिस्तबद्ध पद्धतीने आखण्यात आली होती.
'Gramgeeta Das Atre Maharaj' Jayanti समारोप कार्यक्रमाला गुरुवर्य आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी आमदार दादाराव केचे, बाबुराव धोटे, कारंजा तालुका सेवाधिकारी बालू टुले, आष्टी तालुका सेवाधिकारी तारेश बोडखे, संतोष तायडे, विपुल ढोले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना आचार्य वेरुळकर म्हणाले की, आज तंत्रज्ञानाने माणूस जोडला गेला. पण, संस्कारांनी तुटला. अशा वेळी ग्रामगीता दास अत्रे महाराजांनी सुरू केलेली ही शिबिर परंपरा म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या स्वप्नपूर्तीची खरी पायरी असल्याचे सांगितले.