तभा वृत्तसेवा
हदगाव,
gusty-winds-rain : तालुक्यासह बरडशेवाळा, पळसा, मनाठा आणि परिसरात सोमवार. 8 जूनला दुपारी 2 च्या सुमारास वादळी वाèयासह पावसाने मोठी दाणादाण उडवली. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे केळीसह विविध फळबागांचे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी सौरऊर्जा पॅनेल तसेच वीज खांब पडल्याने किंवा वाकल्याने विद्युत पुरवठा विस्कळीत झाला.
या नैसर्गिक आपत्तीत तालुक्यातील पळसा येथील अल्पभूधारक शेतकरी संदीप गुणवंतराव मस्के यांना मोठा फटका बसला. त्यांच्या गट क्रमांक 31 मधील शेतात झाडाखाली बांधलेल्या बैलाचा वीज कोसळल्याने जागीच मृत्यू झाला. ऐन खरीप हंगाम आणि पेरणीपूर्व काळात घडलेल्या या घटनेने संबंधित शेतकरी कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहे.
ही माहिती महसूल विभाग तसेच पशूसंवर्धन विभागाला देण्यात आली. शेतकèयांच्या उपजीविकेचे महत्त्वाचे साधन असलेल्या बैलाचा मृत्यू झाल्याने मस्के कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे शासनाने नैसर्गिक आपत्ती अंतर्गत नुकसानभरपाई देऊन शेतकèयाला तातडीची मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी बांधवांकडून होत आहे.
दरम्यान, वादळी वाèयामुळे परिसरातील अनेक शेतांमधील केळी व इतर फळबागांचेही नुकसान झाले आहे. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून सौरऊर्जा पॅनेलचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. वीज खांब कोसळल्याने काही गावांचा विद्युत पुरवठा काही काळ खंडित झाला होता.
तीर्थक्षेत्र केदारनाथ परिसरातील तलाव आणि आसपासच्या भागातही पावसाचा जोर अधिक होता. या भागातील अनेक शेतकèयांच्या पिकांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी तलाठी कोथळकर व कृषी सहायक गजानन संगेवार यांनी शेतकèयांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची माहिती घेतली. शासनाकडे आवश्यक अहवाल पाठवण्याची कार्यवाही सुरू होती.