पुलगावात औद्योगिक वसाहत सुरू करा

    दिनांक :09-Jun-2026
Total Views |
भाजपा जिल्हाध्यक्ष गाते यांची मागणी
 
पुलगाव, 
Industrial Estate पुलगाव येथे औद्योगिक वसाहत निर्माण करण्यात यावी, अशी मागणी पुलगाव परिसर विकास संघर्ष समितीच्या वतीने भाजपा जिल्हाध्यक्ष संजय गाते यांच्याकडे करण्यात आली. त्या निवेदनाच्या अनुषंगाने संजय गाते यांनी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची मुंबई येथे शासकीय निवासस्थानी भेट घेऊन पुलगावात औद्योगिक वसाहती संदर्भात निवेदन दिले.
 
 
magani
 
पुलगाव येथे उद्योगाकरिता आवश्यक पाणी, दळण वळणाकरिता रेल्वे आणि समृद्धी महामार्ग आहे. शहरालगत गुंजखेडा, सोरटा, कुरझडी, रसूलाबाद या भागात औद्यौगिक वसाहतीकरिता शासकीय जमीन उपलब्ध आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमुळे पुलगाव, नाचणगाव, गुंजखेडा परिसरात मोठ्या प्रमाणात कुशल कामगार सुद्धा आहेत. त्यामुळे एमआयडीसी फेज २ पुलगाव येथेच करण्याबाबतची मागणी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याकडे केली. पुलगाव येथे एमआयडीसी फेज २ च्या निर्मितीकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्योगमंत्री उदय सामंत यांना पत्र देवून चर्चा करून पुलगाव, नाचणगाव, गुंजखेडा व परिसरातील जनतेला न्याय मिळवून देण्याकरिता प्रयत्न करू, असे आश्वासन पालकमंत्री डॉ. भोयर यांनी दिले असल्याचे गाते यांनी सांगितले.