वर्धा,
agnihotri अधिक मास हा हिंदू धर्मात खास महत्त्वाचा काळ मानला जातो. शास्त्रांनुसार अधिक मासात केलेली पूजा, तर्पण, पितृकर्म, व्रत आणि दान यांची फळे अनेकपटीने वाढतात. पुराणे आणि धर्मग्रंथ सांगतात की या काळात घट्ट नियमांवर आधारित उपवास, सत्संग, विष्णु-नारायण किंवा शिव स्तोत्रांचे पठण, गीता-अध्ययन, विष्णु सहस्रनाम आणि देवी स्तोत्रांचे जप केल्याने पापकर्म कटू होते आणि पुण्यवृद्धी होते. अनेक परंपरांमध्ये या मासात पितृकर्म व तर्पणासाठी वेगळे महत्त्व दिले जाते, असे मार्गदर्शन पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी केले.

महाकाली धामतीर्थ, महाकाली येथे अधिक ज्येष्ठ पौर्णिमा व पंधरवाडी निमित्त पं. शंकरप्रसाद व शिवकुमारी अग्निहोत्री यांच्या हस्ते त्रिदेवींचे अष्टांग योग पद्धतीने पूजन व होम हवन झाल्यानंतर पं. अग्निहोत्री मार्गदर्शन करीत होते. प्राचीन काळात हिरण्यकश्यपू नावाचा एक क्रूर राक्षस राजा होता, ज्याला ब्रम्हाच्या वरदानामुळे शती प्राप्त होती. कोणत्याही मनुष्याने किंवा प्राण्याने, कोणत्याही शस्त्राने किंवा घरात किंवा बाहेर त्याचा मृत्यू होऊ शकत नव्हता. हा अहंकारात बुडलेला राजा आपल्या राज्यात देवाचे नाव घेण्यास बंदी घालून स्वतःची पूजा करवून घेत असे. परंतु, त्याचाच मुलगा प्रल्हाद भगवान विष्णूचा परम भत होता आणि तो सतत नारायण जप करत असे. हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला मारण्यासाठी अनेक प्रयत्न केले. परंतु, प्रल्हादाची विष्णूभक्ती इतकी प्रबळ होती की प्रत्येक वेळी तो सुखरूप बाहेर आला आणि होलिका जळून राख झाली.agnihotri हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला नारायण सर्वत्र आहे, या खांबातही असल्याचे सांगितले तेव्हा रागावलेल्या राजाने खांबाला लाथ मारली. त्या खांबातून विष्णूंचा नरसिंह अवतार प्रकट झाला. जो न मनुष्य होता न प्राणी, न घरात न बाहेर, न शस्त्राने मरणारा अशा गूढ रूपात हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवर घेऊन म्हटले की मी ना मानव आहे ना प्राणी, आता रात्र आहे ना दिवस, तू ना घरात आहे ना घराबाहेर, ना शस्त्र आहे ना अस्त्र, ना वार आहे ना महिना हा अधिक मास आहे आणि आपल्या तीक्ष्ण नखांनी त्याचे पोट फाडून ठार मारले, अशा प्रकारे नरसिंहांने भत प्रल्हादाचे रक्षण केले. अहंकाराचा नाश केला तो महिना होता अधिक मास. ज्यातून भती आणि विश्वासाची प्रेरणा जागृत होते, असे अग्निहोत्री म्हणाले.