मुंगोली विस्तार प्रकल्पातील शेतकऱ्यांना न्याय द्या

विजय पिदुरकर यांची मागणी

    दिनांक :09-Jun-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
वणी, 
vijay-pidurkar : तालुक्यातील मुंगोली विस्तार प्रकल्प (चिंचोली-शिरोणी अधिग्रहण) अंतर्गत वगळण्यात आलेल्या शेतकèयांच्या जमिनी अधिग्रहण प्रक्रियेत समाविष्ट करून त्यांना न्याय देण्याची मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी उपविभागीय अधिकारी, वणी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
 
 

y9Jun-Mungoli 
 
 
 
निवेदनात नमूद करण्यात आले की, मुंगोलीच्या विस्तारासाठी 2014-15 मध्ये जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यावेळी गावातील काही शेतकèयांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या, मात्र गट क्रमांक 46 व 48 मधील शेतकèयांना आश्वासन देऊनही जमिनीचा समावेश करण्यात आला नाही. 2024 मध्ये मुंगोली गावठाणातील इमारती हटवून नवीन ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले. मात्र गेल्या सात वर्षांपासून या शेतकèयांना आर्थिक मोबदला नाही की रोजगाराची संधी मिळाली नाही. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे.
 
 
वेकोलि खाणकामामुळे परिसरातील जलस्रोतांवर वाईट परिणाम झाला असून शेतीचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी उपजीविकेच्या संकटाला सामोरे जात आहेत. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याने शेतकèयांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. मुंगोली विस्तार प्रकल्पातील गट क्र. 46 व 48 मधील शेतकèयांच्या जमिनी अधिग्रहण प्रक्रियेत समाविष्ट करून त्यांना मोबदला, पुनर्वसन व न्याय द्यावा, अशी मागणी विजय पिदुरकर यांनी प्रशासनाकडे केली आहे.