सरसकट कर्जमाफी व पीकविम्यासाठी निवेदन

    दिनांक :09-Jun-2026
Total Views |
कारंजा (घा.), 
Pradhan Mantri Fasal Bima Yojana तालुयातील हजारो शेतकर्‍यांनी मागीलवर्षी प्रधानमंत्री फसल विमा योजनेत सहभाग घेतला होता. मात्र, सॅटेलाईट सर्व्हेक्षणातील त्रुटीपूर्ण आकडेवारीचा आधार घेऊन शेतकर्‍यांना विमा लाभापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला. यासोबतच शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुती योजनेत सर्व शेतकर्‍यांना २ लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्यावी, कारंजा व सारवाडी मंडळाचा पीकविमा योजनेत तातडीने समावेश करावा, या मागण्यांसाठी स्थानिक शेतकर्‍यांनी आज ८ रोजी तहसीलदारांना निवेदन दिले.
 
 
vuna
 
 (संग्रहित छयाचित्र)
 
 मागीलवर्षी तालुयात अनेक मंडळांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. विशेष म्हणजे, शासनाने केलेल्या प्रत्यक्ष पीक कापणी प्रयोगांमध्येही उत्पादनात लक्षणीय घट झाल्याचे स्पष्ट झाले होते. परंतु, काही मंडळांमध्ये सॅटेलाईट सर्व्हेक्षणातील तांत्रिक त्रुटींमुळे प्रत्यक्ष परिस्थितीच्या उलट, म्हणजेच जास्त उत्पादन झाल्याचे कागदावर दाखवण्यात आले. त्यातच कारंजा आणि सारवाडी मंडळाला पीकविमा नुकसान भरपाईतून पूर्णपणे वगळल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. दुसरीकडे, सन २०१९ मधील कर्जमुती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकर्‍यांनी बँकांकडून पुन्हा कर्ज घेतले होते. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षांतील सततची अतिवृष्टी, निसर्गाची अवकृपा आणि शेतमालाला योग्य भाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. जुन्या जाचक निकषांमुळे नव्या योजनेचा लाभ ८० टके शेतकर्‍यांना मिळणार नाही, अशी भीती व्यत केली आहे. त्यामुळे सरकारने कोणतीही अट न ठेवता २ लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी निवेदनातून लावून धरण्यात आली आहे. निवेदन सादर करताना शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.