मुंबई,
Dhurandhar creates history on OTT चित्रपटगृहांमध्ये घवघवीत यश मिळवल्यानंतर रणवीर सिंगचा ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. डिजिटल प्रदर्शनानंतर अवघ्या काही दिवसांतच या चित्रपटाने विक्रमी प्रेक्षकसंख्या मिळवत आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
‘धुरंधर: द रिव्हेंज’ हिंदीसह तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे देशभरातील विविध भाषिक प्रेक्षकांपर्यंत चित्रपट पोहोचला. विशेष म्हणजे, चित्रपट पाहणाऱ्यांपैकी मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांनी स्मार्ट टीव्ही आणि कनेक्टेड स्क्रीनचा वापर केल्याचे दिसून आले आहे. यावरून घरच्या घरी मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्याचा कल वाढत असल्याचे स्पष्ट होते.