नागपूर,
Senior Citizen Foundation ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान, नागपूर व अमर नगर ज्येष्ठ नागरिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जामसावळी व कोराडी येथे तीर्थक्षेत्र दर्शन सहल आयोजित करण्यात आली.
सहलीदरम्यान ज्येष्ठ नागरिकांनी जामसावळी येथील प्रसिद्ध हनुमान मंदिर तसेच कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा माता मंदिराचे दर्शन घेतले. Senior Citizen Foundation या सहलीत एकूण ३४ सभासद सहभागी झाले.प्रतिष्ठानचे सचिव राजूजी मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली व मंडळाचे अध्यक्ष देविदासजी आगरकर यांच्या प्रयत्नातून ही सहल आयोजित करण्यात आली. सहल यशस्वी करण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
सौजन्य:उज्ज्वल रोकडे ,संपर्क मित्र