गंगाझरी ग्रा.पं. चौकशीसाठी ग्रामस्थांचे धरणे आंदोलन

गैरव्यवहार प्रकरण तापले; नागरिकांमध्ये संताप

    दिनांक :09-Jun-2026
Total Views |

dharne
 
 
गोंदिया, 
Sit-in protest at Gangazari तालुक्यातील गंगाझरी ग्रामपंचायतीत कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने चौकशीची मागणी केली. आम्ही केलेले आरोप जर खोटे ठरले, तर आम्हाला फासावर लटकवा, अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांने मांडली. याच मागणीसाठी त्यांनी बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात केली आहे. गावकऱ्यांनी महिनाभरापूर्वी ग्रामपंचायतीतील गैरव्यवहाराबाबत जिल्हा प्रशासनाकडे तक्रार दाखल केली. दरम्यान, माजी सरपंच सोनू घरडे यांनी गावकऱ्यांविषयी अवमानकारक भाषेचा वापर करून त्यांना गावगुंड संबोधल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला. या वक्तव्याचा उपस्थित गावकऱ्यांनी तीव्र निषेध केला. ग्रामपंचायतीतील सर्व ठेकेदारी स्वतः सरपंचच करीत असून, अनेक कामांमध्ये बोगस बिलांचा वापर करून आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला. गावातील मयत नागरिकांना मोफत लाकूड पुरवठा करण्याऐवजी त्यांच्या नावावर हजारो रुपयांची बिले काढण्यात आल्याचा गंभीर आरोपही ग्रामस्थांनी केला. सामान्य निधीतून चढ्या दराने वस्तू खरेदी करून लाखो रुपयांचा अपहार झाल्याचा दावा करत, भूखंड विक्रीद्वारे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम वसूल केल्याचा आरोप केला.