तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
yavatmal-news : रबी हंगाम 2025-26 मध्ये आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत राज्य शासनामार्फत ज्वारी, बाजरी, मका, रागी खरेदीकरिता शेतकèयांची नोंदणी करण्यासाठी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनमार्फत महागाव, पांढरकवडा, पाटण, पुसद, आर्णी, उमरखेड, घाटंजी, कळंब व राळेगाव या नऊ ठिकाणी खरेदी केंद्र उघडण्यात आले आहे.
या खरेदी केंद्रात तालुका खरेदी विक्री संघ महागाव, तालुका खरेदी विक्री संघ पांढरकवडा, बळीराजा फळे फुले भाजीपाला कृषी उत्पादन पणन व प्रक्रिया सहकारी संस्था पाटण, किसान मार्केट यार्ड शेलू (बु) पुसद, शेतकरी कृषी खाजगी बाजार दत्तरामपूर, आर्णी, तालुका खरेदी विक्री संघ उमरखेड, तालुका खरेदी विकी संघ घाटंजी, तालुका खरेदी विक्री संघ कळंब व तालुका खरेदी विक्री संघ राळेगाव या केंद्रांचा समावेश आहे.
जिल्ह्यात ज्वारी, बाजरी, मका, रागी खरेदीकरिता ऑनलाईन नोंदणी 1 एप्रिल ते 15 मे करण्यात येणार होती. सद्यस्थितीत नोंदणी विचारात घेऊन शासनाने ज्वारी, बाजरी, मका, रागी खरेदीकरिता ऑनलाईन नोंदणीसाठी 10 जून 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता शेतकèयांनी आवश्यक कागदपत्रे जसे आधारकार्ड, 7/12 उतारा, पीकपेरा व बँक पासबुकची सुस्पष्ट झेरॉक्स प्रत संबंधित खरेदी केंद्रांवर स्वतः हजर राहून ज्वारी, बाजरी, मका, रागी खरेदीकरिता ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी विजय गाढवे यांनी केली आहे.