साकोली पोलिसांची राष्ट्रीय महामार्गावर कारवाई
साकोली:
Tobacco seized राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचून साकोली पोलिसांनी सुगंधी तंबाखूचे वाहन अडवून जवळपास साडेतीन लाखाचा माल जप्त केला. आज ९ रोजी सकाळी ही कारवाई करण्यात आली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे साकोलीचे ठाणेदार महादेव आचरेकर यांनी मौजा सेंदूरवाफा येथे कर्मचाèयांना सोबत घेत सापळा रचला. दरम्यान देवरी कडून येत असलेली एमएच ३५ एआर ७९६५ क्रमांकाची मारोती व्हॅन पोलिसांनी अडविली. तपासणी केली असता, त्यात बंदी असलेला सुगंधी तंबाखू आढळून आला.
वाहन चालक मोहित मदन कापसे, वय ३० रा. देवरी याने सुगंधी तंबाखू साकोली येथील व्यापारी तरुण राजकुमार मल्लानी याला देण्यासाठी आणल्याची माहिती दिली. त्यामुळे गाडीतील जवळपास साडेतीन लाख रुपये किमतीचा माल जप्त करुन पोलिसांनी मल्लानी यांच्या घरी धाड टाकली. या कारवाई त्यांच्या घरुन ५ हजार रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला. या कारवाईत पोलिसांनी वाहनही जप्त केले. दोन्ही आरोपी विरुद्ध पोलिस स्टेशन, साकोली येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, उपविभागीय अधिकारी शिवम विसापुरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरिक्षक महादेव आचरेकर, पोलीस उपनिरिक्षक प्रशांत वडुले, अमलदार दिनेश तिजारे, मिलिंद बोरकर, सचिन कापगते, लोकेश कोटवार यांनी केली आहे.