राज्य निवडणूक आयुत वाघमारे
वर्धा,
Zilla Parishad and Panchayat Samiti elections ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी विविध प्रवर्गाकरिता राखून ठेवावयाच्या जागेची आरक्षण निश्चिती निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करुन निश्चिती करावी, अशा सुचना राज्य निवडणूक आयुत दिनेश वाघमारे यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात सार्वत्रिक व पोट निवडणुकी संदर्भात आढावा बैठकीत त्यांनी सुचना केल्या. बैठकीला जिल्हाधिकारी वान्मथी सी., अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हाधिकारी रमा जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश खताळे, आर्वीचे उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट, हिंगणघाटचे आकाश अवतारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, आठही तहसिलचे तहसिलदार उपस्थित होते.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीबाबत न्यायालयाने आदेश दिल्यास दिवाळीनंतर निवडणूका घेण्यात येईल. यासाठी सर्व संबंधित विभागांनी निवडणुकीसाठी तयारी करावी. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कर्मचारी कमी पडत असल्यास इतर विभागातील कर्मचार्यांची निवडणूक कामासाठी नियुती करावी. आरक्षण निश्चितीबाबत अडचण असल्यास निवडणूक आयोगाचे मार्गदर्शन घ्यावे, अशा सुचना वाघमारे यांनी केल्या.
Zilla Parishad and Panchayat Samiti elections बैठकीमध्ये जिल्ह्यातील ५१९ ग्राम पंचायतीपैकी सन २०२४ मध्ये ३१५ ग्रामपंचायत, सन २०२५ मध्ये १ ग्रामपंचायत, सन २०२६ मध्ये ५० ग्रामपंचायतीची मुदत संपलेली असून २ नवनिर्मित ग्रामपंचायत असून अशा ३६८ ग्रापंच्या सदस्य पदासाठी आरक्षण निश्चित करण्यात येणार असल्याचे तसेच सदस्याचे आरक्षण निश्चित करतांना अडचणी व ५० टक्केच्या मर्यादेत आरक्षण निश्चित झालेल्या ग्रामपंचायती, ५० टक्के च्या वर आरक्षण जात असलेल्या ग्रामपंचायतीची माहिती तसेच जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या इव्हीएम मशीनच्या संख्येची माहितीचा तपशिल बैठकीत सांगण्यात आला.