अभिषेक बॅनर्जींना झटका; आवाजाच्या नमुन्याला स्थगिती देण्यास नकार

    दिनांक :01-Jul-2026
Total Views |
कोलकाता
abhishek banerjee तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांना कलकत्ता उच्च न्यायालयाने झटका दिला़ प्रक्षोभक वक्तव्यांशी संबंधित एका प्रकरणाच्या तपासादरम्यान त्यांच्या आवाजाचा नमुना घेण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेत न्यायालयाने तत्काळ हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

abhishek banerjee
abhishek banerjee  सुनावणीदरम्यान न्या. तीर्थंकर घोष यांनी टिप्पणी केली की, तपासासाठी काय आवश्यक आहे आणि काय नाही हे ठरवणे न्यायालयाचे काम नाही़ तर तो तपास यंत्रणेचा विशेषाधिकार आहे. तपास यंत्रणेने तपासादरम्यान कोणते पुरावे गोळा करावेत, हे न्यायालय ठरवू शकत नाही. त्यानंतर न्या. घोष यांनी या प्रकरणाच्या सुनावणीतून स्वतःला दूर केले आणि याचिका मुख्य न्यायाधीशांकडे पाठवली़

निवडणूक प्रचारादरम्यान प्रक्षोभक वक्तव्ये
abhishek banerjee  हे प्रकरण विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अभिषेक बॅनर्जी यांनी केलेल्या कथित प्रक्षोभक वक्तव्यांवरून दाखल एफआयआरशी निगडित आहे़ याचा तपास पश्चिम बंगाल सीआयडी करत आहे. अभिषेकने यापूर्वी एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्या प्रकरणात त्याला ३१ जुलैपर्यंत अंतरिम संरक्षण देण्यात आले आहे. न्यायालयाने त्याला तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देशही दिले आहेत. या तपासाच्या संदर्भात, सीआयडीने अलिकडेच अभिषेक बॅनर्जी यांचा आवाजाचा नमुना घेण्यासाठी बिधाननगर न्यायालयाकडे परवानगी मागितली. कनिष्ठ न्यायालयाने अर्ज स्वीकारत ३० जूनला दंडाधिकारी व न्यायवैद्यक तज्ञांच्या उपस्थितीत आवाजाचा नमुना घेण्याचा निर्देश दिला.