पीएमश्री जिप उच्च प्राथमिक बेसिक केंद्र शाळेचा प्रवेशोत्सव

    दिनांक :01-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
कळंब, 
admission-festival : महाराष्ट्र शासनाच्या शाळा प्रवेशोत्सव अभियानांतर्गत पीएमश्री जिप उच्च प्राथमिक बेसिक केंद्र शाळा, कळंब येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 चा शाळा प्रवेशोत्सव अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
 
 
 
y1July-P-M-Shri
 
 
 
नव्याने शाळेत प्रवेश घेणाèया विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, टाळ्यांच्या गजरात व आनंददायी वातावरणात स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षणाबाबत प्रेरणा देत नियमित उपस्थिती, गुणवत्तापूर्ण शिक्षण व सर्वांगीण विकासाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून नगर पंचायत कळंबचे मुख्याधिकारी येमाजी धुमाळ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक रुपेश राऊत, राजू मोगरकर, मलकापूरे, राजेंद्र देशमुख उच्च शेणी मुख्याध्यापक, बेसिक शाळा आणि प्रभारी केंद्र समन्वयक शगुफ्ता खान यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
 
 
नवागत विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना शैक्षणिक साहित्य व शुभेच्छा देण्यात आल्या. शाळेतील शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसर आनंदमय वातावरणाने भरून गेला. संचालन स्मिता भगत यांनी, तर सुषमा लाड यांनी सर्वांचे आभार मानले. शिक्षणाविषयी जनजागृती, प्रत्येक बालकाला शाळेच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गोडी निर्माण करणे हा या शाळा प्रवेशोत्सवाचा मुख्य उद्देश साध्य झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.