कारंजा शहर ठाणेदारपदी अमर चौरे

    दिनांक :01-Jul-2026
Total Views |
कारंजा लाड,
amar chaure जिल्हा पोलिस दलातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत आणि गतिमान करण्याच्या दृष्टिकोनातून पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी २९ जून रोजी तीन पोलिस अधिकार्‍यांच्या अंतर्गत प्रशासकीय बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने कारंजा शहर, अनसिंग आणि जिल्हा वाहतूक शाखेच्या प्रभारी अधिकार्‍यांचा समावेश आहे.
 

amar chaure appointed as karanja city police station incharge in administrative reshuffle 
कारंजा शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शुला यांना नुकतीच पदोन्नती मिळाल्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचे पद रिक्त झाले होते. या रिक्त जागी आता अनसिंग पोलिस स्टेशनचे ठाणेदार अमर चौरे यांची प्रशासकीय बदली करण्यात आली आहे. अमर चौरे हे स्वतः उच्चशिक्षित अधिकारी असून आधुनिक तंत्रज्ञानामध्ये त्यांचा मोठा हातखंडा आहे. सध्याच्या डिजिटल युगात वाढणार्‍या सायबर गुन्ह्यांपासून ते सर्वच तांत्रिक बाबींचे त्यांना इत्यंभूत ज्ञान आहे. गुन्हेगारी क्षेत्रातील त्यांचा अनुभव अत्यंत भन्नाट आणि दांडगा आहे. गुंतागुंतीचे गुन्हे कसे उघडकीस आणायचे, याचे विशेष कौशल्य त्यांच्याकडे आहे. विशेष म्हणजे, केवळ चोरीच्या पद्धतीवरून ही चोरी कोणत्या सराईत गुन्हेगाराने केली असावी, याचा अचूक वेध घेण्याचा तगडा अनुभव चौरे यांच्या पाठीशी आहे.