जम्मू
amarnath समुद्र सपाटीपासून सुमारे 14 हजार 500 फूट उंचीवर असलेल्या अमरनाथ गुहेतील बर्फाचे शिवलिंग वेगाने वितळत असून आता त्याची उंची आठ फुटावर आली आहे. दोन महिन्यांपूर्वी ही उंची 20 ते 22 फूट होती.
amarnath मूळ शिवलिंगाची जाडी जी असते त्याची उंची सहा ते आठ फूट इतकी असते. पण त्यावर गोठलेल्या बर्फाची काही काठी वरपर्यंत गेलेली दिसते. स्थानिक लोक त्यालाही शिवलिंगाचा एक भाग मानतात. त्यामुळे त्याची उंची धरली तर ही उंची साधारणपणे दोन महिन्यांपूर्वी 20 ते 22 फूट इतकी होती. पण आता ती 7 ते 8 फुटांवर आली आहे. गेल्या काही वर्षांपासून राखी पौर्णिमेपूर्वीच शिवलिंग पूर्णपणे वितळून जात असल्याचे दिसत आहे.
amarnath वाढते जागतिक तापमान, हवामानातील बदल आणि यात्राकाळातील गुहेत पोहोचणाèया लाखो भाविकांमुळे परिसरातील तापमान वाढत असल्याने हे बर्फाचे शिवलिंग वितळण्याचा वेग वाढत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. यापूर्वी 2013, 2016 आणि 2018 मध्ये यात्रा सुरू झाल्यानंतर अवघ्या दहा दिवसात शिवलिंगाची उंची दीड फुटावर आली होती.