हिमाचल, काश्मीर, अरुणाचलमध्ये ढगफुटी

अनेक गावांचा संपर्क तुटला, भूस्खलनामुळे महामार्गांवरील वाहतूक बंद

    दिनांक :01-Jul-2026
Total Views |
जम्मू/ सिमला/ इटानगर
cloudbursts मुसळधार पाऊस आणि ढगफुटीमुळे जम्मू-काश्मीरचा डोडा जिल्हा, हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्हा आणि अरुणाचल प्रदेशातील लोअर सियांग जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. ढगफुटीमुळे अनेक घरे ढिगाऱ्याखाली दबली गेली, तर भूस्खलन आणि पुरामुळे ग्रामीण भागांचा शहराशी संपर्क तुटला आहे. महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली असून, हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. ढिगाऱ्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. प्रशासनाकडून अद्याप जीवितहानीची माहिती देण्यात आली, नसली तरी नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक नागरिकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे.
 
cloudbrust 
cloudbursts  जम्मू-काश्मीरमधील डोडा येथील भालेसा भागातील खल्जुगासर परिसरात बुधवारी पहाटे मुसळधार पावसानंतर झालेल्या ढगफुटीमुळे अनेक घरे वाहून गेली. या भागात अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याने जम्मूला जोडणारा महामार्ग बंद करण्यात आला. उभी पिके आणि फळबागा पूर्णपणे नष्ट झाल्या. अनेक घरे आणि इतर खाजगी मालमत्तेचेही नुकसान झाले. स्थानिक प्रशासनाने बाधित भागात मदत आणि बचाव कार्य सुरू केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थान प्राधिकरणाच्या एका अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला दिली. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील काश्तिगड परिसरातही पूर आला. ढगफुटीमुळे परिसरातील अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहे. बाधित भागांमध्ये अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पर्यायी मार्गांचा शोध घेतला जात असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.
 

cloudbursts  शेकडो गावांना पुराचा वेढा
हिमाचलच्या चंबा जिल्ह्यात ढगफुटीमुळे अनेक नद्यांना पूर आला, पर्यायाने शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे. सालुनी उपविभागातील लानोट आणि फागडोग गावांतील अनेक घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली. ढिगाऱ्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. भूस्खलनामुळे चंबा-तिसा मुख्य रस्ता बंद झाला असून, २५ पेक्षा जास्त पंचायतींमधील वाहतूक विस्कळीत झाली सार्वजनिक बांधकाम विभाग आणि इतर संबंधित विभागांची पथके रस्ते दुरुस्ती आणि मदतकार्यात गुंतलेली आहेत.
cloudbursts  दहा हजार नागरिक बाधित, पाच जणांचा मृत्यू
अरुणाचल प्रदेशातील लोअर सियांग जिल्ह्यात ढगफुटी आणि भूस्खलनाने मोठे नुकसान झाले असून, १४ गावांतील दहा हजार नागरिक या आपत्तीमुळे प्रभावित झाले आहेत. अचानक आलेल्या पुरात पाच जण वाहून गेले असून, त्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले. अनेक ग्रामस्थांना घरे सोडून शेतातील तात्पुरत्या झोपड्यांमध्ये आश्रय घ्यावा लागत आहे. पुरामुळे पाणीपुरवठा व्यवस्था, वीज खांब आणि विद्युत वाहिन्याही नष्ट झाल्या. जिल्हा प्रशासन, भारतीय सैन्य, भारत-तिबेट सीमा संघटना (बीआरओ), राज्य पोलिसाचे युद्धपातळीवर बचाव व मदतकार्य सुरू आहे.
cloudbursts ईशान्य भारताला पावसाचा तडाखा
ईशान्य भारतात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आसाम, मेघालय, सिक्कीम आणि नागालॅण्ड या राज्यांमध्ये पूर आणि भूस्खलनाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. संपर्क तुटलेल्या गावांमध्ये हेलिकॉप्टरद्वारे मदत पोहोचविली जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे.