आज दशांक योग; 4 राशींची लागणार लॉटरी!

    दिनांक :01-Jul-2026
Total Views |
Dashanka yoga today जुलै महिन्याची सुरुवात होताच ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दुर्मिळ योग तयार होत आहे. ग्रहांच्या राशी आणि नक्षत्रांतील बदलांचा परिणाम सर्व राशींवर होत असतो, असे ज्योतिषतज्ज्ञांचे मत आहे. अशातच आज, १ जुलै २०२६ रोजी  सायंकाळी ६:५१ वाजता विशेष दशांक योग निर्माण होणार आहे. या वेळी सूर्य आणि युरेनस हे एकमेकांपासून ३६ अंशांच्या कोनीय स्थितीत असतील. या विशेष ग्रहस्थितीमुळे तयार होणारा दशांक योग काही राशींसाठी अत्यंत लाभदायक मानला जात आहे. या योगाचा सर्वाधिक सकारात्मक प्रभाव मेष राशीवर दिसून येणार आहे. करिअरमध्ये प्रगतीची दारे उघडतील आणि दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे मार्गी लागतील. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता असून व्यवसायातही नफा मिळण्याचे संकेत आहेत.
 
 

दशांक योग 
 
  • सिंह राशीच्या व्यक्तींनाही या योगाचा मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये बढती मिळू शकते तसेच एखादी मोठी व्यावसायिक संधी मिळू शकते. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता असून सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल. गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळू शकतो. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठीही हा काळ अनुकूल मानला जात आहे.
  • तूळ राशीसाठी हा योग आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे. उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. करिअरमध्ये नवीन संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मात्र आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जात आहे. कौटुंबिक वातावरण अधिक आनंदी आणि सुसंवादी राहील.
  • धनु राशीच्या व्यक्तींना या काळात नशिबाची उत्तम साथ मिळेल. अडथळे दूर होऊन कामे सुरळीत पूर्ण होतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळू शकते. वडिलोपार्जित मालमत्तेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये मोठी प्रगती होऊन कामाच्या ठिकाणी प्रशंसा आणि बढतीचे संकेत आहेत. व्यवसायात नफ्यात वाढ होईल आणि घरात आनंदाचे वातावरण राहील.