डॉ. सोनाली वैरागडे यांना समर्पित डॉक्टर पुरस्कार प्रदान

    दिनांक :01-Jul-2026
Total Views |
नागपूर,
dr sonali vairagade राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या पूर्वसंध्येला असोसिएशन ऑफ चॅरिटेबल हॉस्पिटल्स यांच्या वतीने तसेच माधव नेत्रालय आय इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर यांच्या सहकार्याने समाजसेवेसाठी समर्पित डॉक्टरांचा विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या प्रतिष्ठित सोहळ्यात कांचन नितीन गडकरी यांच्या हस्ते डॉ. सोनाली वैरागडे यांना रुग्णसेवेप्रती असलेली निस्सीम निष्ठा, करुणामय सेवा आणि वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान याबद्दल “समर्पित डॉक्टर पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले.

dr sonali vairagade
 
यावेळी दत्ता मेघे आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. धीरज झाडे हे देखील उपस्थित होते. डॉ. सोनाली वैरागडे यांचे या मानाच्या पुरस्काराबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. त्यांच्या रुग्णसेवेचा आणि समाजहिताच्या कार्याचा प्रवास असाच यशस्वी आणि प्रेरणादायी राहो, हीच शुभेच्छा.
सौजन्य: निकिता लुटे, संपर्क मित्र