नागपूर,
lions club एक जुलै रोजी साजरे होणारे राष्ट्रीय चिकित्सक दिवस (डॉक्टर्स डे), सनदी लेखापाल दिवस (सीए डे) आणि शेतकरी दिवस (फार्मर्स डे) निमित्त लायन्स क्लब नागपूर सेवन स्टारतर्फे समाजातील जेष्ठ व सेवाभावी व्यक्तिमत्त्वांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.
या प्रसंगी नागपूरातील ज्येष्ठ होमिओपॅथी चिकित्सक पद्मश्री डॉ. विलासजी डांगरे, ज्येष्ठ स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. यामिनीताई आळशी, सनदी लेखापाल लाय. सीए अजित दामले तसेच शेतकरी नरेश राऊत यांचा शाल, सन्मानचिन्ह आणि ‘ग्रामगीता’ ग्रंथ देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला लायन्स क्लब नागपूर सेवन स्टारचे नवनिर्वाचित अध्यक्ष लाय. डॉ. शांतीदास लुंगे, प्रशासक लाय. डॉ. प्रमोद रक्षमवार, सचिव लाय. डॉ. अजय सावरकर, कोषाध्यक्ष लाय. नरेंद्र मातुरकर तसेच सदस्य लाय. अतुल जोशी, लाय. डॉ. अशोक पवार, लाय. प्रकाश दातार, लाय. मुकुल पंडित आदी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शनही यावेळी करण्यात आले.
सौजन्य: शांतीदास लुंगे, संपर्क मित्र