मुदतबाह्य कीटकनाशके, खते व जैवउत्तेजक जप्त

-पांढरकवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल -17.82 लाखांचा मुद्देमाल जप्त

    दिनांक :01-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
पांढरकवडा,
expired-pesticides-fertilizers-biostimulants : खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकèयांची फसवणूक करणाèया मोठ्या आंतरराज्य रॅकेटचा कृषी विभागाने पर्दाफाश केला आहे. पांढरकवडा पंचायत समितीच्या कृषी विभागाने केळापूर तालुक्यातील खैरगाव (दे) येथे धाड टाकून तब्बल 17 लाख 82 हजार 135 किंमतीचा 2 हजार 285 किलो अवैध, मुदतबाह्य कीटकनाशके, रासायनिक खते व जैवउत्तेजकांचा साठा जप्त केला.
 

YTL 
 
 
 
या प्रकरणी यश गजानन शिवनवार (वय 26) याच्याविरुद्ध पांढरकवडा पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कृषी विभागाला खैरगाव (दे) येथे मोठ्या प्रमाणात अवैध कृषी निविष्ठांचा साठा करून विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.
 
 
त्यानुसार कृषी अधिकारी सुरेश चव्हाण यांच्या नेतृत्वात भरारी पथकाने संशयित ठिकाणी छापा टाकला. तपासणीदरम्यान आरोपीच्या घरालगतच्या गोदामात मोठ्या प्रमाणात मुदतबाह्य व बेकायदेशीर कृषी निविष्ठांचा साठा आढळून आला. हा साठा पंचांसमक्ष जप्त करून सीलबंद करण्यात आला.
 
 
प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून, तेलंगण राज्यातील आदिलाबाद व सारखानी परिसरातून अत्यल्प दरात मुदतबाह्य व विनापरवाना कीटकनाशके आणली जात होती.
 
 
त्यानंतर त्यांच्या बाटल्या व डब्यांवर नामांकित कंपन्यांचे हुबेहूब बनावट स्टिकर्स लावून नव्याने पॅकिंग करून ती औषधे शेतकèयांना विकली जात होती. त्यामुळे शेतकèयांची आर्थिक फसवणूक तर होत होतीच, शिवाय पिकांच्या उत्पादनालाही गंभीर धोका निर्माण होत असल्याचे कृषी विभागाच्या तपासात स्पष्ट झाले आहे.
 
 
जप्त करण्यात आलेल्या साठ्यामध्ये 358.55 किलो मुदतबाह्य कीटकनाशके किंमत 8 लाख 491 रुपये, 1,735 किलो अनधिकृत रासायनिक खते 4 लाख 56 हजार 50 रुपये आणि 188.15 किलो जैवउत्तेजके किंमत 5 लाख 22 हजार 594 रुपये यांचा समावेश आहे.
 
 
आरोपीविरुद्ध कीटकनाशके अधिनियम 1968, अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 तसेच खत नियंत्रण आदेश 1985 अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
ही कारवाई जिल्हास्तर भरारी पथकाचे अध्यक्ष तथा मोहीम अधिकारी प्रवीण जाधव, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक धीरज मोहेकर, कृषी अधिकारी सुरेश चव्हाण, रूपाली इंगळे, राहुल डाखोरे, निलेश भोयर, सुरेश बुटले व राहुल डंभारे यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाèयांच्या मार्गदर्शनात पार पाडली.
 
 
या प्रकरणामुळे परिसरातील शेतकèयांत संताप व्यक्त होत असून या आंतरराज्य रॅकेटमागील मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे.