उपसा सिंचनसाठी विशेष पॅकेज द्या : आमदार डॉ. नरोटे

    दिनांक :01-Jul-2026
Total Views |
गडचिरोली,
milind narote धान उत्पादनात अग्रेसर असलेल्या गडचिरोलीत सिंचनाच्या अपुर्‍या सुविधा आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना पावसाच्या भरवशावर उत्पादन घ्यावे लागते. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यासाठी विशेष पॅकेज देण्यात यावे, अशी मागणी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी केली.
 
gadchiroli lift irrigation special package demanded by milind narote in assembly
 
विधिमंडळ अधिवेशनात 29 जून रोजी पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसाय विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेत आमदार डॉ. नरोटे यांनी सहभाग घेतला. ते म्हणाले, काही प्रकल्प वन कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. त्यामुळे विशेष पॅकेज देऊन उपसा सिंचन योजना राबवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली. यासोबतच पशुपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी बीडच्या परळी तसेच बारामतीच्या धर्तीवर शासकीय पशुसंवर्धन महाविद्यालय मंजूर करण्याची मागणीही त्यांनी केली.
गडचिरोलीतील शासकीय कृषी महाविद्यालयात 80 टक्के जागा आदिवासींसाठी राखीव आहेत, त्या जागा कायम ठेवून इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संधी मिळावी, यासाठी एक अतिरिक्त तुकडी मंजूर करावी, अशीही मागणी त्यांनी केली.