गोंदियात रात्री दमदार सकाळी रिपरिप दुपारी उघडीप

- पावसाच्या हजेरीने बळीराजा सुखावला

    दिनांक :01-Jul-2026
Total Views |
गोंदिया,
gondia rainfall मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर आर्द्रा नक्षत्राच्या शेवटच्या टप्प्यात जिल्ह्यात पावसाने आगमन केले असून बुधवारी 1 जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. रात्रभर धो-धो बरसलेल्या पावसानंतर सकाळच्या सुमारास पावसाची रिपरिप पहावयास मिळाली तर दुपारी पावसाने उघडीप दिली. दरम्यान, या पावसामुळे बळीराजा सुखावला असून शेतीच्या कामांना वेग आले आहे.
 

gondia rainfall update heavy rain at night farmers relieved as monsoon gains pace 
पावसाचे मृग नक्षत्र कोरडे गेले त्यानंतर लागलेल्या आर्द्रा नक्षत्रानेही दगा दिला. त्यामुळे शेतकर्‍यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. विशेष म्हणजे, पाऊस लांबणीवर गेल्याने शेतकर्‍यांच्या पेरण्याही खोळंबल्या असताना उकाळ्यामुळे नागरिकही हैराण झाले होते. त्यातच बुधवारी मध्यरात्रीनंतरgondia rainfall  दमदार पावसाने सुरुवात केली. दुपारपर्यंत पावसाची रिपरिप कायम होती. दरम्यान, हवामान खात्याकडून 1 जुलै रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास घेण्यात आलेल्या नोंदीनुसार गेल्या 24 तासात गोंदिया तालुक्यात 40.8 मिमी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर आमगाव तालुक्यात 57.2 मिमी., तिरोडा 1.3 मिमी., गोरेगाव 55.8 मिमी., तर सालेकसा तालुक्यात 79.5 मिमी. अतिवृष्टीची नोंद करण्यात आली असून देवरी 18.4 मिमी., मोरगाव अर्जुनी 5.0 मिमी. तर सडक अर्जुनी तालुक्यात 20.8 मिमी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर जून महिन्यापासून आतापर्यंत झालेल्या पावसाची नोंद पाहता सरासरीच्या तुलनेत फार कमी पाऊस झाला असून जिल्ह्यात 206.2 मिमी. पाऊस अपेक्षित असताना केवळ 85.6 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.