श्रीनगर
amarnath yatra अमरनाथ यात्रेपूर्वी सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. जम्मू-काश्मीरमधील कठुआ पोलिसांनी रात्रभर राबवलेल्या माेहिमेत दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या हाजी लतीफला अटक केली. हाजी लतीफ दोन दशकांपेक्षा जास्त काळ पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-ताेयबासाठी प्रमुख मदतनीस म्हणून कार्यरत होता.
amarnath yatra लतीफवर पाकिस्तानी दहशतवाद्यांना भारतीय सीमेत घुसखोरी करण्यास आणि सुरक्षा दलांवर हल्ले करण्यास मदत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप आहे. सूत्रांनुसार, लतीफने १२ पाकिस्तानी दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यास मदत केली होती. तसेच सियालकोट सेक्टरमधून भारतात घुसखोरी केल्यानंतर जैश-ए-मोहम्मदच्या वरिष्ठ कमांडरनी लतीफची भेट घेतली होती, असेही तपासात समाेर आले आहे.
amarnath yatra जम्मू-काश्मीरमध्ये सीमेपलीकडून होणारी घुसखोरी सुलभ करण्यासाठी लतीफ अनेक वर्षांपासून पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्सच्या (आयएसआय) वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता, असेही उघड झाले आहे.