वर्धा,
murder case नागपूर-वर्धा मार्गावरील नालवाडी येथील हॉटेल मोंटानामध्ये एका युवकावर चाकूने वार करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना मंगळवार ३० जून रोजी रात्री घडली. याप्रकरणी रामनगर पोलिसात तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इमरान खान असे जखमी युवकाचे नाव असून त्याच्यावर सावंगी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास हॉटेलमध्ये अचानक झालेल्या वादाचे रूपांतर हल्ल्यात झाले. आरोपीने इमरान खानवर चाकूने वार करत घटनास्थळावरून पलायन केले. जखमी इमरान खान हा जिल्ह्यातील ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. murder case अशरद खान यांचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये हल्ला करणारा स्पष्ट दिसत असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. हल्ला करणार्याला अटक करण्यासाठी रामनगर पोलिसांनी चार शोधपथकं तयार केली.