बगदाद
corruption अंतर्गत अस्थिरतेने पिचलेल्या इराकमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपावरून अनेक नेत्यांच्या घरांवर सातत्याने छापे टाकले जात आहेत. या मालिकेतच इराकी खासदार आलिया नासिफ यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यात तब्बल २० अब्ज इराकी दिनार अर्थात् १४६ कोटी रुपयांची रोकड आणि मोठ्या प्रमाणावर सोने जप्त करण्यात आले आहे.
corruption नासिफ या माजी पंतप्रधान मोहम्मद शिया अल सुदानी यांच्या चीफ ऑफ स्टाफ राहिल्या आहेत. तपासादरम्यान मोठ्या प्रमाणात सोने आणि शस्त्रेही जप्त करण्यात आली. राजधानी बगदादच्या ग्रीन झोनमध्ये इराकच्या ‘काउंटर टेररिझम सर्व्हिस’च्या विशेष पथकाद्वारे मंगळवारी पहाटे नासिफ यांच्या निवासस्थानी छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान एका खोलीत नोटांचे ढीग आणि तळघरात मोठ्या प्रमाणात सोन्याचा साठा आढळून आला. पथकाने आतापर्यंत ८५ दशलक्ष डॉलर्स अर्थात तब्बल ८०५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केल्याचे एका अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितले.
corruption या कारवाईनंतर, ग्रीन झोनचे प्रवेशद्वार सील करण्यात आले आहेत. मे २०२६ च्या अखेरीस ताब्यात घेतलेले माजी उप तेल शुद्धीकरण मंत्री अदनान अल जुमैली यांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. यापूर्वीही, इराकी अधिकाऱ्यांनी सरकारी कोषागारातून लुटलेले १०७ मिलियन डॉलर्स अर्थात् हजार कोटी रुपयांपेक्षाही अधिकची रोकड जप्त केली होती.