मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी ‘वाघ मित्र’ उपक्रम

-शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पारवा -वनपरिक्षेत्राचा पुढाकार -‘स्वरजीवन’च्या कलाकारांनी वेधले ग्रामस्थांचे लक्ष

    दिनांक :01-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
पारवा, 
wagh-mitra-tiger-friend-initiative : यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासीबहुल क्षेत्र असलेल्या पारवा येथे शेतकèयांची सुरक्षा आणि वन्यजीवांचे संरक्षण या दोन्ही बाबी लक्षात घेऊन एका विशेष जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले.
 
 

y1July-Wagh-Mitra 
 
 
 
वनविभाग पांढरकवडा अंतर्गत येणाèया पारवा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाच्या वतीने आणि पारवा वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार, 29 जून रोजी पारवा ग्रामपंचायतच्या भव्य पटांगणात स्वरजीवन सांस्कृतिक कला व बहुउद्देशीय संस्था, घाटंजी यांच्या सहकार्याने पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली.
 
 
सध्या जंगलाबाहेरील क्षेत्रांत वाघांचा वावर वाढल्याने शेतकरी आणि शेतमजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर गावकèयांमध्ये विशेषतः शेतीकामासाठी जाणाèया नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आणि ‘वाघ मित्र’ अंतर्गत स्थानिक तरुणांना या मोहिमेत सहभागी करून घेण्यासाठी या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
 
 
घाटंजी येथील स्वरजीवन संस्थेच्या कलाकारांनी आपल्या बहारदार आणि संवेदनशील यातून वन्यजीवांचे महत्त्व, वाघांचा सामना झाल्यास शेतकèयांनी घ्यावयाची काळजी, आणि वन विभागाला करायचे सहकार्य याविषयी गावकèयांना सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.
 
 
वन्यजीव आपले शत्रू नसून निसर्गाचा महत्त्वाचा भाग आहेत. त्यामुळे संघर्षाऐवजी समन्वयाने आणि सावधगिरीने हा प्रश्न कसा हाताळायचा, याचा संदेश या पटांगणात उपस्थित शेकडो नागरिकांना पथनाट्यातून देण्यात आला.
 
 
या प्रसंगी मार्गदर्शन करताना वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन राठोड यांनी आपल्या उद्बोधनात अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मांडले. ते म्हणाले, आपल्या दैनंदिन जीवनात शेतात काम करण्यासाठी जाताना किंवा रस्त्याने ये-जा करताना वन्य प्राणी आणि मानवाचा सामना होण्याच्या घटना वारंवार घडतात. हा वन्यजीव व माणसांमधील संघर्ष टाळण्यासाठी नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी आणि पाळायची पथ्ये खूप महत्त्वाची आहेत.
 
 
या बेसिक पण अत्यंत गरजेच्या गोष्टी या छोट्याशा पथनाट्याद्वारे लोकांपर्यंत पोचवल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. हा प्रबोधनाचा कार्यक्रम खरोखरच खूप यशस्वी झाला असून परिसरातील लोकांनी दिलेला प्रतिसाद कौतुकास्पद असल्याचे सांगत राठोड यांनी उपस्थित सर्व ग्रामस्थांचे व कलाकारांचे स्वतः आभार मानले.
 
 
या कार्यक्रमासाठी पारवा वर्तुळाच्या क्षेत्र सहायक सुरेखा कुंभेकर, वनरक्षक अक्षय तोडसाम, वनरक्षक अरविंद जामकर, वनरक्षक आरती भसारकर, वनरक्षक प्रेमला सिडाम आणि वनरक्षक पूजा सिडाम यांनी विशेष परिश्रम घेतले.
 
 
कार्यक्रमाला पारवा ग्रामपंचायत पदाधिकारी, वन कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता उपस्थितांच्या कडकडाटात आणि ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताच्या सामूहिक गायनाने अतिशय उत्साहात झाली. आदिवासीबहुल भागातील नागरिकांसाठी राबवलेल्या या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.