मुंबई
ikka trailer ‘धुरंधर’मध्ये अक्षय खन्नाने साकारलेल्या रेहमान डकैतच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता पुन्हा एकदा अक्षय खन्ना चर्चेत आला आहे. यावेळी तो ‘इक्का’ या आगामी चित्रपटात एका अत्यंत दमदार भूमिकेत दिसणार असून, चित्रपटाचा नुकताच प्रदर्शित झालेला ट्रेलर प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण करून गेला आहे. सनी देओल आणि अक्षय खन्ना या दोन प्रभावी अभिनेत्यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर पाहून सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा वर्षाव सुरू झाला आहे.
ट्रेलरमध्ये जबरदस्त सस्पेन्स आणि अनपेक्षित ट्विस्ट पाहायला मिळतात. अक्षय खन्नाचा लूक आणि त्याचा अभिनयाचा अंदाज पुन्हा एकदा प्रभावी ठरत असल्याचे ट्रेलरवरून स्पष्ट होते. याचबरोबर सनी देओलचा दमदार स्क्रीन प्रेझेन्सही लक्ष वेधून घेतो.
‘इक्का’ या चित्रपटाद्वारे सनी देओल ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत असून तो या चित्रपटात वकील अर्जुन मेहराच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे, याआधी सनी देओलने 33 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘दामिनी’मध्येही वकिलाची भूमिका साकारली होती, ज्यातील त्याचा कोर्टरूममधील संवाद आणि आवाज आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. ‘इक्का’मध्येही त्याच प्रकारची तीव्रता आणि प्रभावी कोर्टरूम ड्रामा अनुभवायला मिळणार असल्याचे संकेत ट्रेलरमधून मिळतात.
ट्रेलरची सुरुवातच कोर्टरूम ikka trailer सीनने होते, जिथे सनी देओल विचारतो, “त्या रात्री काय घडलं, ते तुम्ही कोर्टाला सांगाल का?” त्यानंतर उद्योगपती हर्षवर्धन गौर यांचा मुलगा शौर्यमानच्या भूमिकेत अक्षय खन्नाची एन्ट्री होते. त्याच्यावर एका महिलेच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. अर्जुन मेहरा हा असा वकील आहे ज्याने आजवर एकही केस हरलेली नाही. शौर्यमान त्यालाच आपला बचाव वकील म्हणून निवडतो, ज्यामुळे प्रकरणाला वेगळंच वळण मिळतं. सर्वांना तो आरोपी असल्याची खात्री असतानाही अर्जुन त्याची केस लढण्याचा निर्णय घेतो, यामुळे कथानकात मोठा धक्का बसतो.अर्जुन अखेर न्यायालयात सत्याच्या बाजूने उभा राहतो की शौर्यमानचा खरा चेहरा उघड करतो, याभोवतीच ‘इक्का’ची कथा फिरताना दिसते. ट्रेलरमधील या थरारक घडामोडींना प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी अक्षय खन्नाच्या अभिनयाचे विशेष कौतुक केले आहे. “रेहमान भाई परत आला आहे”, अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. तर “अक्षय त्याच्या आवाजाने आणि अभिनयाने पुन्हा एकदा धुमाकूळ घालणार”, असे दुसऱ्याने म्हटले आहे. “अक्षय पुन्हा एकदा हिरोला खाऊन टाकेल”, अशा शब्दांतही अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे.या चित्रपटात सनी देओल आणि अक्षय खन्ना यांच्यासोबत दिया मिर्झा, तिलोत्तमा शोम, संजीदा शेख आणि शिशिर शर्मा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा चित्रपट येत्या 10 जुलै रोजी ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित होणार आहे.