नागपूरमध्ये फिजिओथेरपी सेंटर व जिम फिटनेस स्टुडिओचे उद्घाटन

    दिनांक :01-Jul-2026
Total Views |
नागपूर,
fitness studio in nagpur खरे टाऊन, धरमपेठ येथील कोनार्क अपार्टमेंट, स्व. कृष्णा खोंडे मार्ग येथे डॉ. सानिका किरण साऊरकर यांच्या फिजिओथेरपी अँड रिहॅबिलिटेशन सेंटर तसेच राकेश रवींद्रराव दरबेशवार यांच्या ‘आर फिट फिटनेस स्टुडिओ’ जिमचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या केंद्राचे उद्घाटन रजनीताई श्रीकृष्णराव साऊरकर आणि लताताई रवींद्रराव दरबेशवार यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. सानिका कि. साऊरकर या अनुभवी फिजिओथेरपीस्ट म्हणून तर राकेश र. दरबेशवार हे जिम ट्रेनर म्हणून नागपूर शहरात परिचित आहेत.
 
 
fitness studio in nagpur
 
या फिजिओथेरपी सेंटरमध्ये कपिंग थेरपी, पिलाटेस थेरपी, संधिवात, पाठीच्या मणक्याचे आजार, सांधेदुखी तसेच हाडांशी संबंधित विविध उपचार उपलब्ध असणार आहेत. तर फिटनेस स्टुडिओमध्ये वजन कमी-जास्त करणे, योगा, पॉवरलिफ्टिंग, बॉडीबिल्डिंग, ॲथलेटिक्स प्रशिक्षण यांसारख्या सेवा आधुनिक उपकरणांच्या साहाय्याने दिल्या जाणार आहेत. उद्घाटनानिमित्त दि. १५ जुलैपर्यंत सर्व सेवांवर ४० ते ५० टक्के विशेष सवलत जाहीर करण्यात आली आहे. हे फिजिओथेरपी सेंटर व जिम दररोज सकाळी १२ ते सायंकाळी ६ या वेळेत सुरू राहणार असून नागरिकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन संचालकांनी केले आहे.
 
सौजन्य: रवींद्र पांडे, संपर्क मित्र