भरधाव कारने तलाठ्याला चिरडल्याने जागीच मृत्यू

धक्कादायक दृश्य उघड

    दिनांक :01-Jul-2026
Total Views |
जालना
jalna accident जालना शहरातून अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मंठा रोडवरील कोठारी हिल्स परिसरात भरधाव वेगाने आलेल्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका तलाठ्याला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला असून, या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, अपघात की घातपात याबाबतही संशय व्यक्त केला जात आहे.
 

jalna accident cctv video speeding car kills talathi digambar kurewad in kotari hills 
अंबड तालुक्यातील सज्जावर कार्यरत असलेले तलाठी दिगंबर कुरेवाड हे आपले कार्यालयीन कामकाज आटोपून घरी परतण्यासाठी निघाले होते. दरम्यान, ते मंठा रोडवरील कोठारी हिल्स परिसरात रस्त्याच्या कडेला थांबले असताना, अचानक मागून आलेल्या एका अनियंत्रित आणि अतिवेगाने धावणाऱ्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की कुरेवाड हे रस्त्यावर दूर फेकले गेले आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. धडक दिल्यानंतर कार चालकाचे नियंत्रण सुटून वाहन थेट रस्त्याबाहेरील शेतात घुसल्याचेही समोर आले आहे.या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर jalna accident  मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिगंबर कुरेवाड हे आपल्या दुचाकीवर रस्त्याच्या कडेला उभे असल्याचे स्पष्ट दिसते. त्याच वेळी मागून वेगाने आलेल्या कारने त्यांना जबर धडक दिल्याचे दृश्य कैद झाले आहे. या दृश्यांनी अपघाताची तीव्रता आणि भीषणता अधिकच अधोरेखित केली आहे.
 
 
घटनेची माहिती मिळताच जालना jalna accident  पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकरणी निष्काळजीपणे आणि अतिवेगाने वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संबंधित कारचालकाविरुद्ध तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, या घटनेनंतर महसूल विभागासह संपूर्ण जालना शहरात शोककळा पसरली असून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताचा नेमका तपशील आणि कार चालकाच्या हालचाली याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, हा अपघात नेमका कसा घडला किंवा त्यामागे काही वेगळा हेतू होता का, याबाबतही तपास यंत्रणा चौकशी करत आहेत.