कारंजा लाड,
rainfall जून महिना संपला असला तरी कारंजा तालुयात अद्यापही समाधानकारक व सार्वत्रिक पाऊस झालेला नाही. जून अखेर तालुयात सरासरी १०७ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, काही महसूल मंडळांमध्ये चांगला पाऊस झाला असला तरी अनेक भाग अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या संथ गतीने सुरू असून शेतकर्यांची चिंता कायम आहे.
महसूल विभागाच्या आकडेवारीनुसार, तालुयातील हिवरा महसूल मंडळात सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून, येवता महसूल मंडळात सर्वात कमी पाऊस झाला आहे. पावसाचे असमान वितरण झाल्यामुळे काही ठिकाणी पेरण्या पूर्ण झाल्या आहेत, तर अनेक गावांमध्ये अद्याप पेरणी रखडली आहे.यंदाच्या हंगामात शेतकर्यांनी कपाशी, सोयाबीन, तूर, मूग, उडीद व हळद या पिकांवर भर दिला आहे. सुरुवातीला झालेल्या हलया पावसानंतर अनेक शेतकर्यांनी धाडसाने पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने उगवलेल्या पिकांवर ताण निर्माण झाला आहे. काही भागात दुबार पेरणीची शयता व्यक्त केली जात आहे.कृषी विभागाने शेतकर्यांना हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे करण्याचे आवाहन केले आहे. पुरेसा व सलग पाऊस झाल्यानंतरच उर्वरित पेरण्या करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.हवामान खात्याने पुढील काही दिवसांत पावसाची शयता वर्तविली असली तरी शेतकर्यांचे लक्ष आता सार्वत्रिक व दमदार पावसाकडे लागले आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाल्यास खरीप हंगामाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
एकूणच, जून महिन्या अखेर कारंजा तालुयात १०७ मि.मी. पावसाची नोंद झाली असली तरी तो सर्व भागात समान प्रमाणात न झाल्याने शेतीची स्थिती अद्याप अनिश्चित आहे. त्यामुळे बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागून असून, समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
महसूल मंडळ निहाय पर्जन्यमान
कारंजा - १०६.५ मि.मी., धनज- ११२.३ मि. मी., हिवरा - १३७.७ मि. मी., उंबर्डा. - ६८.८ मि. मी., कामरगाव - ९२.८ मि.मी., खेर्डा - १३६ मि. मी