महंत नृत्य गोपाल दास यांची प्रकृती खालावली

बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल

    दिनांक :01-Jul-2026
Total Views |
लखनौ
mahant-nritya-gopal-das श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांची प्रकृती खालावल्याने त्यांना लखनौ येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ८९ वर्षीय महंत दास बेशुद्ध झाले होते, त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मूत्रमार्गाचा संसर्ग (युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन) झाल्याचे निदान केले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
 
mahant
 
mahant-nritya-gopal-das रुग्णालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, महंत नृत्य गोपाल दास यांना सोमवारी दुपारी आपत्कालीन विभागात बेशुद्ध अवस्थेत आणण्यात आले. प्राथमिक तपासणीनंतर, डॉक्टरांनी मूत्रमार्गाच्या संसर्ग झाल्याचे सांगितले. सध्या त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहे. तज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहे आणि आवश्यक वैद्यकीय सेवा पुरवत आहे.
 
mahant-nritya-gopal-das दरम्यान ट्रस्टची महत्त्वाची बैठक ६ जुलै रोजी होणार आहे. दोन प्रमुख विश्वस्त, चंपत राय आणि अनिल मिश्रा यांच्या राजीनाम्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि राम मंदिराच्या देणगीचा वाद यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली. मात्र, महंत दास यांची प्रकृती बिघडल्याने नियोजित बैठक लांबण्याची शक्यता आहे. वयोमानानुसार आरोग्याच्या समस्यांमुळे ते गेल्या काही काळापासून ट्रस्टच्या बैठकांना आभासी माध्यमाने उपस्थित राहत आहेत. त्यांची सध्याची प्रकृती पाहता, ६ जुलै रोजी होणाऱ्या प्रस्तावित बैठकीत त्यांच्या सहभागाबाबत सध्या अनिश्चितता आहे.