नागपूर
morbhavan-bus-stand शहराच्या मध्यवर्ती भागातील मोरभवन बसस्थानकाचा चेहरामोहरा लवकरच बदलणार आहे. प्रवाशांसाठी मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी आग्रही मागणी परिवहन समितीच्या सभापती मंगला खेकरे यांनी केली आहे. बसण्याची उत्तम व्यवस्था, सुसज्ज प्रतीक्षालय, बसेसच्या वेळापत्रकाचे डिजिटल डिस्प्ले व चारही बाजूंना आधुनिक शौचालये उभारावीत, अशी सूचना त्यांनी परिवहन विभागाच्या बैठकीत मांडली.
morbhavan-bus-stand मोरभवन बसस्टॅण्डवर दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असते. मात्र, उन्हाळ्यात सावलीची, पावसाळ्यात आडोशाची व स्वच्छ शौचालयाची कमतरता असल्याच्या तक्रारी सातत्याने येतात. याची दखल घेत खेकरे म्हणाल्या, महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना ताटकळत उभे राहावे लागते. डिजिटल डिस्प्ले नसल्याने बसेसची वेळ कळत नाही. त्यामुळे संपूर्ण परिसराचे काँक्रीटीकरण करून, वृक्षारोपणाने सुशोभीकरण करावे व चारही दिशांना स्वच्छ टॉयलेट ब्लॉक उभारावेत.
morbhavan-bus-stand बस थांब्यांवर माहिती फलक
शहरातील विविध बसथांब्यांवर नागरिकांना सहज दिसतील असे मार्ग व वेळापत्रकाचे माहिती फलक लावावेत, अशी सूचनाही त्यांनी केली. तसेच, खापरी बस डेपोच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत तेथे भक्कम सुरक्षा भिंत उभारण्याची मागणी त्यांनी केली.
morbhavan-bus-stand या सूचनांवर मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. खापरी डेपोच्या सुरक्षेसाठी तातडीने लोखंडी व तारांचे मजबूत कुंपण लावण्याचे निर्देश दिले .