मुंबई
mumbai narcotics raid मुंबईतून एक मोठी आणि धक्कादायक तस्करीची घटना समोर आली असून केळीच्या ट्रकमधून गांजा वाहतुकीचे रॅकेट उघडकीस आले आहे. मुंबईच्या नार्कोटिक्स विभागाने भंडाऱ्यात केलेल्या धडाकेबाज कारवाईत तब्बल अडीच कोटी रुपयांचा गांजा आणि सुमारे 30 लाख रुपये किमतीचा आयशर ट्रक जप्त करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केळीच्या mumbai narcotics raid कॅरेटमध्ये लपवून ओडिशाहून मुंबईच्या दिशेने गांजाची तस्करी केली जात असल्याची खात्रीलायक माहिती नार्कोटिक्स विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे विभागाने ट्रकचा माग काढत सापळा रचला. साकोली तालुक्यातील सेंदूरवाफा येथील टोल नाक्यावर हा ट्रक अडवण्यात आला आणि त्यानंतर संपूर्ण कारवाई उघड झाली.झडतीदरम्यान ट्रकमध्ये केळीच्या कॅरेटमध्ये अत्यंत हुशारीने लपवून ठेवलेला 245 किलो गांजा आढळून आला. हा माल ओडिशातून लोड करून मुंबईच्या दिशेने नेला जात असल्याचे तपासात समोर आले आहे. कारवाईदरम्यान ट्रक चालक कमलेश बघेल (वय 42, रा. नागपूर) आणि क्लीनर प्रशांत दुर्बे (वय 22, रा. अमरावती) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.या कारवाईत केवळ अमली पदार्थच नव्हे तर वाहतुकीसाठी वापरलेला सुमारे 30 लाख रुपये किमतीचा आयशर ट्रकही जप्त करण्यात आला आहे. मुंबई नार्कोटिक्स विभागाने भंडाऱ्यात केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली असून या तस्करीमागील संपूर्ण नेटवर्कचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.