तभा वृत्तसेवा
पांढरकवडा,
pandharkawada-cattle-pound-incident : पांढरकवडा नगर परिषद अंतर्गत कार्यरत कोंडवाडा व्यवस्थापनातील कथित गंभीर अनियमितता, जनावरांच्या नोंदीतील कथित विसंगती, जनावरांच्या मृत्यूच्या नोंदी तसेच प्राणी कल्याणाशी संबंधित विविध बाबींची स्वतंत्र, निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी युवा टायगर फोर्सचे संयोजक अंकित नैताम यांनी भारत सरकारच्या भारतीय प्राणी कल्याण मंडळाकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे.
ही तक्रार भारतीय प्राणी कल्याण मंडळाच्या अधिकृत तक्रार नोंदणी प्रणालीवर दाखल करण्यात आली असून मंडळाने तिची अधिकृत दखल घेत तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीचा तक्रार क्रमांक 20-3303/2026-27/तक्रार असा अधिकृत नोंदणी क्रमांक आहे. त्यामुळे या प्रकरणाची अधिकृत नोंद केंद्र शासनाच्या भारतीय प्राणी कल्याण मंडळाकडे झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
सादर करण्यात आलेल्या निवेदनात कोंडवाडा व्यवस्थापनातील अनियमितता, जनावरांच्या नोंदींमधील विसंगती, मृत जनावरांच्या नोंदी, अभिलेखांची पडताळणी, प्राणी कल्याणाशी संबंधित नियमांचे पालन तसेच संपूर्ण व्यवस्थापनाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 अंतर्गत प्राप्त कागदपत्रांच्या आधारे काही गंभीर मुद्दे उपस्थित करण्यात आले असून, त्याबाबत वस्तुस्थिती स्वतंत्र चौकशीतून समोर आणावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
निवेदनामध्ये कोंडवाड्याची प्रत्यक्ष पाहणी, उपलब्ध अभिलेखांची तपासणी, तज्ञ पशुवैद्यकीय अधिकाèयांकडून निरीक्षण, संबंधित आर्थिक व्यवहारांची चौकशी तसेच प्राणी क्रूरता प्रतिबंधक अधिनियम, 1960 आणि इतर लागू नियमांचे पालन झाले आहे किंवा नाही, याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
युवा टायगर फोर्सने संबंधित सक्षम प्राधिकरणांनी या प्रकरणाची पारदर्शक, निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशी करून सत्यस्थिती जनतेसमोर आणावी तसेच चौकशीत दोषी आढळणाèया संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
मुक्या जनावरांचे संरक्षण, प्राणी कल्याण आणि सार्वजनिक हिताच्या उद्देशाने ही तक्रार करण्यात आली असून, भारतीय प्राणी कल्याण मंडळासह संबंधित वरिष्ठ प्रशासकीय अधिकाèयांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा युवा टायगर फोर्सने व्यक्त केली.