वाबळेवाडीच्या धर्तीवर विठोलीच्या पएम श्री जिल्हा परिषद शाळेची वाटचाल

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा मध्ये जिल्ह्यात पहिली

    दिनांक :01-Jul-2026
Total Views |
मानोरा,
pm shri vittholi zilla pad schoolrisha राज्यातील पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडी येथील जिल्हा परिषद शाळा ही एक आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून परिचित आहे. याच धर्तीवर मानोरा तालुयातील विठोली येथील पीएम श्री जिल्हा परिषद केंद्रीय शाळेची वाटचाल सुरू झाली आहे. गेल्या दोन वर्षा पूर्वी या शाळेत केवळ तीन शिक्षक आणि शंभरच्या आत विद्यार्थी संख्या होती. त्या नंतर अर्जुन लोंढे यांनी मुख्याध्यापक पदाचा पदभार स्वीकारला आणि या शाळेचा कायापालट सुरू झाला.
 

pm shri vittholi zilla parishad school modeled on wabalevadi school transformation in manora 
दरम्यानच्या काळात वाशीम येथे मुख्य कार्यपालन अधिकारी म्हणून वैभव वाघमारे हे रुजू झाले. त्यांनी जिल्हा परिषद शाळा आणि शिक्षणासाठी काही उपक्रम राबविले. त्यामध्ये लोकसहभागातून शाळांची रंगरंगोटी शाळेचे चित्र बदलले. येथूनच अर्जुन लोंढे यांनी प्रभावित होऊन आपल्या शाळेचे स्वरूप बदलण्याची तयारी केली. प्रथम त्यांनी शाळेची रंगरंगोटी करून शाळेत परसबाग लावली. शाळा डिजिटल केली.मागील वर्षी शाळेची केलेली रंगरंगोटी पाहुन तालुयातील पांलकाचा शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला होता त्यांत अर्जुन लोंढे यांनी उन्हाळी शिबिरामध्ये संगणकीय ज्ञान, संगीत योगा विविध भाषा डीझीटल माध्यमे, कृत्रिम बुद्धिमत्ता संदर्भात शिबिरार्थी यांना योग्य असे मार्गदर्शन केले. त्यांना उत्तम प्रतिसाद मिळाल्यामुळे लोंढे यांनी या वर्षी पुर्व प्राथमिक सेमी इंग्लिश शाळा सुरु करण्यासाठी मुख्य कार्यपालन अधिकारी यांची परवानगी घेऊन पीएम श्री अंतर्गत शाळेसाठी नऊ पदवीत्तर शिक्षकांची भरती केली, त्यामुळे या शाळेची नवीन वाटचाल सुरु झाली. त्यामध्ये पूर्व प्राथमीक नर्सरी केजी १ केजी २ इयत्ता एक ते सहावी पर्यन्त च्या विद्यार्थाना सेमी इंग्लिश मध्ये शिकविण्यात येणार आहे. तसेच पीएम श्री चा अभ्यासक्रम ही शिकविण्यात येणार आहे तसेच जर्मन व संस्कृत भाषा अध्यापन, संगणक,योगा संगीत क्रीडा,कराटे व्यवसायीक शिक्षण ही या शाळेत शिकविल्या जाणार आहे.शाळे मध्ये १५ वर्ग खोल्या असून, सर्व खोल्यात इंटररेटीव पॅनल बसविण्यात आले आहे. याला इंटरनेट जोडण्यात आले असून, दिव्यांगासाठी स्वतंत्र वर्गाची व्यवस्था करण्यात आली असून, त्यासाठी दिव्यांग शिक्षकांची नेमनुक केली आहे, त्यामुळे येथे प्रवेश घेण्यासाठी पालकांची एकच झुंबड उडाली आहे. शाळेच्या वर्ग खोल्या सीसीटीव्ही कॅमेरे यांनी जोडल्या आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी संख्या वाढली असून काही विद्यार्थी प्रवेशासाठी वेटिंगवर आहेत.या शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा जिल्हा स्तरीय प्रथम पुरस्कार मिळाला.शाळेमध्ये सुंदर परसबाग असून प्रांगणात जैविक खत निर्मिती प्रकल्प आहे. ही शाळा जिल्ह्यात पर्यटन शाळा म्हणून घोषित करण्यात आली आहे.शाळेच्या प्रांगणात सुसज्ज असे सांस्कृतिक सभागृह उभारण्यात आले आहे.वाबळेवाडी च्या धर्तीवर विद्यार्थ्यांचा आंतरिक व संगणकीय विकास होणार असल्याचे मुख्याध्यापक अर्जुन लोंढे यांनी सांगितले.या शाळेला प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी भेट दिली असून आमदार खासदार यांनीही भेटी दिल्या आहेत. आता या शाळेत एकूण १३ शिक्षक असून, वर्ग पहिली ते सहावी पर्यंत २७८,आणि पूर्व प्राथमिक मध्ये ११६ विद्यार्थी आहे.