मुंबई
rajinikanth kabali भारतीय चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत यांनी गेली पाच दशके आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. वयाची 75 वर्षे ओलांडल्यानंतरही ते आजही प्रमुख भूमिकांमध्ये झळकत असून त्यांच्या प्रत्येक चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असते. 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कुली’नंतर आता त्यांच्या आगामी चित्रपटांची चाहत्यांना आतुरता लागली आहे.
रजनीकांत हे केवळ दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेते नाहीत, तर सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकीही एक आहेत. त्यांच्या कारकिर्दीतील अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली असून, त्यापैकी 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कबाली’ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी आपल्या निर्मिती खर्चाची भरपाई करून एक वेगळाच इतिहास रचला होता.
1975 मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या रजनीकांत यांनी तमिळ चित्रपटसृष्टीपासून हिंदी चित्रपटांपर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. 22 जुलै 2016 रोजी प्रदर्शित झालेला ‘कबाली’ हा त्यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटात त्यांनी ‘कबाली’ ही प्रभावी व्यक्तिरेखा साकारली होती. त्यांचा स्टायलिश लूक, दमदार अॅक्शन आणि प्रभावी अभिनय यामुळे चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाची मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली होती.‘कबाली’चा निर्मिती खर्च सुमारे 90 कोटी रुपये होता. मात्र, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी जगभरातून 90.50 कोटी रुपयांची कमाई करत त्याने आपला संपूर्ण निर्मिती खर्च वसूल केला. कोणत्याही भारतीय चित्रपटासाठी हा अत्यंत उल्लेखनीय टप्पा मानला जातो. रजनीकांत यांच्या अफाट लोकप्रियतेमुळे आणि चित्रपटाभोवती निर्माण झालेल्या उत्सुकतेमुळे प्रदर्शनाच्या दिवशी देश-विदेशातील चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची मोठी गर्दी झाली होती.
‘कबाली’चे दिग्दर्शन पा. रंजीत यांनी rajinikanth kabali केले होते, तर चित्रपटाची निर्मिती कलैपुली एस. थानू यांनी केली होती. रजनीकांत यांच्यासोबत या चित्रपटात राधिका आपटे, धनशिका, अट्टकाठी दिनेश आणि विन्स्टन चाओ यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये ‘कबाली’ने सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक म्हणून आपली नोंद केली होती.