वर्धा,
rajyamata gomata samvad yatra गो-संवर्धन, देशी गाईचे महत्व, सेंद्रीय शेतीस गोमुत्र-गोमयाचे योगदान तसेच शेतकर्यांमध्ये जनजागृती करणे, गोशाळा स्वावलंबी करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग व महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या संयुक्त विद्यमाने राज्यव्यापी राज्यमाता गोमाता संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा ३ जुलै रोजी वर्धा शहरात दाखल होणार आहे. यात्रेच्या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यव्यापी राज्यमाता गोमाता संवाद यात्रा कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर राहणार असून कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणुन महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांची तर खासदार अमर काळे, आमदार अभिजित वंजारी, आमदार सुधाकर अडबाले, आमदार अरुण लखानी, आमदार समीर कुणावार, आमदार राजेश बकाने, आमदार सुमीत वानखेडे, पिपरी ग्राम पंचायतीच्या सरपंच वैशाली गौळकर, जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
राज्यमाता गोमाता संवादयात्रेचे स्वागत करण्यासाठी नागरिकांनी करुणाश्रम, पिपल फॉर अॅनिमल, पिपरी मेघे येथे दि.३ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय उपआयुक्त जगदिश बुकतरे,