वर्धा
saraswati school केळकरवाडी येथील भरत ज्ञान मंदिरच्या सरस्वती शाळा समुहामध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्याथ्र्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश देशपांडे, उपाध्यक्ष संजय जलताडे, कोषाध्यक्ष मदन परसोडकर, मुख्याध्यापक मनीषा काळे, शिक्षक प्रनोज बनकर, अनिता उइके, सुधीर साटोणे, नरेश कुटेमाटे उपस्थित होते. यावेळी संस्थाध्यक्ष देशपांडे, जलताडे व परसोडकर यांच्या हस्ते पुस्तक व शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
सरस्वती विद्या मंदिर सेमी इंग्रजी माध्यम उच्च प्राथमिक शाळा येथे नवीन प्रवेशित मुलांना गुलाब पुष्प व खाऊ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक मंडळासह मुख्याध्यापक दिनेश शेंडे यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी विद्याथ्र्यांचे औक्षवन केले.
यावेळी संस्थाध्यक्ष देशपांडे यांनी शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्याथ्र्यांचे स्वागत करताना सरस्वतीच्या मंदिरात आपण आज पहिले पाऊल ठेवले. या विद्यालयाने संस्कार आणि संस्कृती टिकवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या संस्कात आणि संस्कृतीच्या बळावर शैक्षणिक उपक्रम राबवताना शाळेने यशस्वी विद्यार्थी तयार केले आहे. त्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षकांचे मोठे योगदान आहे. शाळेच्या विकाससाठी संचालक मंडळ कटीबद्ध असल्याचे देशपांडे म्हणाले.