तभा वृत्तसेवा
कळंब,
traffic-congestion : कळंबमधील सर्वसामान्यांकरिता बसस्थानक तथा शिवाजी चौकात वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना अचानक साहेबांची गाडीच या अस्ताव्यस्त वाहतुकीत फसली. हे पाहून परिसरातील नागरिक आता विचारू लागले, ‘साहेब, आता कसं वाटते ?’
त्यामुळे कळंबचे ठाणेदार धनराज निळे हे अजूनपर्यंतही आपल्या लोखंडी पिंजèयातून बाहेर न निघाल्यामुळे कळंबातील वाहतूक व्यवस्था म्हणजे गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
या वाहतूक कोंडीत सापडलेली पोलिस विभागाची गाडी आणि त्या गाडीची होत असलेली परिसरातील चर्चा, यामुळे सर्वसामान्य नागरिकांना होत असलेल्या त्रासाची जाणीव कदाचित या विभागाला झाली असेल, असे लोकांना वाटले.
कळंबच्या या वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर कळंबच्या ठाणेदारांना वेगवेगळ्या नागरिकांनी अनेकदा सुचित केले आहे. परंतु ते आपल्या लोखंडी पिंजèयातून बाहेर येऊन शहराच्या वाहतूक सुरक्षेसंदर्भात कोणताही विचार करताना किंवा या वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण करताना दिसत नाही.
त्यामुळे ‘साहेब..! आता तरी आपल्या प्रशासकीय कार्यात सुधार होईल का..?’ असा प्रश्न शहरातील नागरिक विचारत आहेत.