आनंदाचा 'युनिफॉर्म'; नव्या पाऊलांना संस्थेची साथ!

    दिनांक :10-Jul-2026
Total Views |
आनंदाचा 'युनिफॉर्म'; नव्या पाऊलांना संस्थेची साथ!
विद्यार्थ्यांचे २ गणवेशांसह स्वागत; १९६ लाभार्थी

खापरखेडा, 
anandacha 'uniform' विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था, नागपूर अंतर्गत वर्ग ५ वीच्या सर्व नवप्रवेशित विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश वितरित करण्याचा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. महाराष्ट्र विद्यालय खापरखेडा येथे एका विशेष कार्यक्रमात या मोहिमेचा शुभारंभ झाला.सामाजिक बांधिलकीतून राबवलेल्या या उपक्रमामुळे चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून पालकांनी संस्थेचे आभार मानले आहेत. नवीन वर्गातील पहिले पाऊल विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे पंख देईल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
 
 
Khaperkheda
या उपक्रमांतर्गत खापरखेडा) येथील महाराष्ट्र विद्यालयातील ९१, धापेवाडा येथील कोलबास्वामी विद्यालयातील ५५ आणि व्याहाड येथील परमानंद विद्यालयातील ५० अशा एकूण १९६ विद्यार्थ्यांना ३९२ गणवेश वितरित केले जात आहेत. संस्थेचे अध्यक्ष सुधीर केदार, सचिव सुहास केदार, कोषाध्यक्ष संध्या केदार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला. याप्रसंगी मुख्याध्यापक अरुण वडस्कर, पर्यवेक्षक नरेंद्र माहूरतळे, पर्यवेक्षिका श्यामली चानीकर, शिक्षक प्रतिनिधी अभय पुल्लिवार, काकडे मॅडम व भड मॅडम उपस्थित होत्या. या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.