रुग्णवाहिका कर्मचार्‍यांच्या तत्परतेमुळे अपघातग्रस्ताला ‘गोल्डन अवर’ मध्ये उपचार

    दिनांक :10-Jul-2026
Total Views |
कारंजा लाड,
accident येथील १०८ रुग्णवाहिका सेवेचे पायलट विधाता चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश आणि बीएमई शुभम यांनी आपल्या तत्परतेने आणि माणुसकीच्या भावनेने एका अपघातग्रस्ताचे प्राण वाचविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ९ जुलै रोजी सदर रुग्णवाहिका अमरावती येथे रुग्णाला भरती करुन कारंजाकडे परत येत असताना लोणी टाकळी फाट्याजवळ त्यांना भीषण अपघात झाल्याचे दिसून आले.
 

accident 
 
घटनास्थळी कोणताही विलंब न करता त्यांनी रुग्णाला तात्काळ प्रथमोपचार देत रुग्णवाहिकेतून इर्विन हॉस्पिटल, अमरावती येथे दाखल केले. विशेष बाब म्हणजे, अपघातग्रस्तासोबत त्यावेळी कोणतेही नातेवाईक उपस्थित नव्हते.accident तरीही १०८ च्या पथकाने कोणतीही तमा न बाळगता पूर्ण जबाबदारीने रुग्णाला सुरक्षितपणे रुग्णालयात पोहोचवले.रुग्ण ‘गोल्डन अवर’मध्ये रुग्णालयात पोहोचल्यामुळे त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करता आले.
याबद्दल रुग्णालयातील डॉटरांनी १०८ रुग्णवाहिका पथकाच्या तत्परतेचे व कार्यतत्परतेचे कौतुक करत समाधान व्यक्त केले. पायलट विधाता चव्हाण, डॉ. गणेश आणि बीएमई शुभम यांनी दाखविलेली संवेदनशीलता, कर्तव्यनिष्ठा आणि मानवतेची भावना ही समाजासाठी प्रेरणादायी असून, त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.