निकृष्ठ बियाणे प्रकरणी कंपन्यावर कारवाई करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी - ना. ॲड आकाशदादा फुंडकर

कृषी मंत्री दत्ताजी भरणे यांना प्रत्यक्ष भेटून पत्राव्दारे केली मागणी.

    दिनांक :10-Jul-2026
Total Views |
खामगांव,
adv akashdada fundkar खामगांव विधानसभा मतदार संघातील खामगांव शेगांव तालुक्यासह बुलढाणा अकोला जिल्ह्यातील अनेक गांवांमध्ये सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी आल्या याबाबत ना.ॲड आकाशदादा फुंडकर यांनी कृषी मंत्री ना श्री दत्ताजी भरणे यांना प्रत्यक्ष भेटून याबाबत शेतकऱ्यांच्या अडचणी मांडल्या व या कंपन्यावर कार्यवाही करण्याची व शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी देखील ना. ॲड आकाशदादा फुंडकर यांनी कृषी मंत्री यांच्याकडे केली आहे.
 
 

adv akashdada fundkar 
 
 
खामगांव व शेगांव तालुक्यातील अनेक गांवामधून सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या याबाबत भारतीय जनता पार्टी तर्फे कृषी विभागाला निवेदन देखील देण्यात आले. कृषी विभागाला जवळपास ७८ तक्रारी प्राप्त झाल्या असून यामध्ये शेकडो शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याची बाब समोर आली.adv akashdada fundkar अशा निकृष्ठ दर्जाचे बियाणे बनविणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्याची व शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी कामगार मंत्री ना ॲड आकाशदादा फुंडकर यांनी गुरुवार दि.०९ जुलै २०२६ रोजी राज्याचे कृषी मंत्री ना श्री दत्ताजी भरणे यांना प्रत्यक्ष भेट घेऊन पत्राव्दारे शेतकऱ्यांची मागणी रेटून धरली. या बाबत कृषी मंत्री श्री दत्ताजी भरणे यांनी सकारात्मकता दर्शविली आहे.