वर्धा :
anganwadi sevika andolan सिटू संलग्न आशा व गटप्रवर्तक कर्मचारी संघटना व अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात आज शुक्रवार १० रोजी सिव्हील लाईन भागात महात्मा गांधी पुतळा परिसरात आशा-गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका, मदतनिस, स्त्री परिचर यांनी एकत्र येत काळा दिवस पाळून धरणे आंदोलन केले. संसदेत ११ मार्च २०२५ ला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे वाढीव प्रोत्साहन भत्ता थकबाकीसह तात्काळ द्यावा.
भारतीय कामगार परिषदेच्या शिफारशी लागू कराव्या, नियमितीकरण होईपर्यंत किमान वेतन द्यावे व मूळ वेतन ग्राहक किंमत निर्देशांकाशी जोडावे आणि प्रोत्साहन रक्कमेचा दर दरवर्षी सुधारित करावा. सहा महिन्यांची प्रसुती रजा व २० दिवसांची सेवेतन किरकोळ रजा तसेच वैद्यकीय रजा मंजुर करावी. पेंशन व्यवस्था लागु होईपर्यंत निवृत्ती देऊ नये तो पर्यंत किमान १० लाख रुपये सानुग्राह अनुदान व इतर सामाजिक सुरक्षा लाभ द्यावा, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले.