नप उपाध्यक्ष जाजू यांची पत्रकार परिषद
आर्वी,
Arvi: Municipal Council Education Department सुमित वानखेडे यांच्या नेतृत्वात नगर पालिका शाळांतील विद्यार्थी हिताकरिता निर्णय घेतल्या जात आहेत. आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये हे लक्षात घेऊन नगर परिषदेच्या माध्यमातून शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. शहरातील व परिसरातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे नप उपाध्यक्ष व शिक्षण सभापती गौरव जाजू यांनी आज १० रोजी नगरपालिका सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी नप अध्यक्ष स्वाती गुल्हाने यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
नपचा शिक्षण विभाग विद्यार्थी हिताचे निर्णय घेत आहेत. आ. सुमित वानखेडे यांच्या नेतृत्वात व संकल्पनेतून नगर परिषद अंतर्गत सुरू असलेल्या सर्व शाळातून, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील, अनाथ, दिव्यांग विद्याथ्र्यांना इतर कुठलाही मापदंड न लावता सरसकट शिष्यवृत्ती देण्याचा आणि एकल पालक असलेले विद्यार्थी आणि आर्थिक मागास घटकातील होतकरू व हुशार विद्याथ्र्यांना चाळणी परीक्षा घेऊन शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. पात्र विद्याथ्र्यांपैकी सुरुवातीला २०० विद्याथ्र्यांना प्रति माह ५०० रुपये शिष्यवृत्ती मिळावी ह्या हेतूने नगरपरिषद आर्वी च्या सर्वसाधारण सभेत ठराव सुद्धा घेण्यात आला. निकषातून निवड झालेल्या विद्याथ्र्यांच्या बँक खात्यात ती रक्कम जमा करण्यात येईल, असे सांगितले
या योजनेकरिता आ. वानखडे यांच्याकडून पाठपुरावा करून उपाध्यक्ष व शिक्षण सभापती गौरव जाजू यांना निर्देश देण्यात आले होते. त्या अनुषंगाने उपाध्यक्ष व शिक्षण सभापती गौरव जाजू यांच्या विनंतीनुसार यांनी विषय पटलावर ठेवला, असे नगराध्यक्ष गुल्हाणे यांनी सांगितले. आ. वानखेडे यांच्या नेतृत्वात नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या शाळांमधून शिकवण्यात येत असलेल्या विद्याथ्र्यांच्या जीवनात सकारात्मक बदल होईल असा विश्वास व्यक्त केला. पत्रकार परिषदेला भाजपा गटनेते तथा सभापती संजय भोरात, सभापती जगन गाठे, नगरसेवक शुभांगी गाठे, अजय कट्टमवार, सुनील बाजपेयी, देवीदास साठे, भाजपा शहर अध्यक्ष राहुल गोडबोले उपस्थित होते.