वाशीम,
collector kumbhejkar महाराष्ट्र शासन आणि शांतीलाल मुथा फाउंडेशनच्या वतीने संपूर्ण राज्यासह जिल्ह्यात राबविण्यात येणारा मूल्यवर्धन उपक्रम स्तुत्य आहे, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी ८ जुलै रोजी काढले. भारतीय जैन संघटनेच्या पदाधिकार्यांनी जिल्ह्यातील पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्व शासकीय शाळांत मागील वर्षापासून शांतीलाल मुथा फाऊंडेशन व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या मूल्यवर्धन या उपक्रमाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी योगेश जी कुंभेजकर यांची भेट घेतली.
या भेटीत कुंभेजकर यांना मागील एक वर्षाचा मूल्यवर्धन उपक्रमाबाबत आढावा सादर केला आणि नवीन धोरणा विषयी माहिती दिली. जिल्हाधिकारी यांनी मूल्यार्धन साठी तयार केलेल्या उपक्रम पुस्तिका सविस्तर पाहून त्यावर समाधान व्यक्त केले.
जिल्हा परिषद तसेच खाजगी अनुदानित शाळामध्ये विद्यार्थ्यांना दिले जाणारे मूल्य शिक्षण तसेच शिक्षकांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून दिली जाणारी अध्यापन पद्धती यामध्ये बदल घडून आणण्याची ताकत असल्याचे सांगून जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी मूल्यवर्धन उपक्रमाचे कौतुक केले.collector kumbhejkar याप्रसंगी भारतीय जैन संघटनेचे प्रदेश प्रतिनिधी शिखरचंद बागरेचा, जिल्हाध्यक्ष सौरभ लुनावत, माजी जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी, मूल्यवर्धनचे मास्टर ट्रेनर नागेश बोडखे व मूल्यवर्धन जिल्हा समन्वयक संदीप कांबळे उपस्थित होते.